शिवभूमी विद्यालय, खेड-शिवापूर या विद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला आहे .संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कोंडे, सचिव संग्राम कोंडे, प्रसिद्ध पार्श्र्वगायक अवधूत गांधी, शिवसेना जिल्हाप्रमुख रमेशबाप्पू कोंडे, जिल्हाअधिकारी रवींद्र जगताप, खेड- शिवापुरचे सरपंच स्वप्नील कोंडे, माजी सरपंच अमोल कोंडे, विद्यालयाचे मुख्याध्यापक रुपटक्के सर, उपमुख्याध्यापिका भरगुडे मॅडम, कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष कांबळे सर, प्रताप कोंडे, राजेंद्र कोंडे, मनोज कोंडे, सतीश कोंडे, शंकर कोंडे, उमेश कोंडे, इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय व संस्थापक शिवाजीराव कोंडे यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख अतिथींचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे अवधूत गांधी यांनी शिवराय अष्टक या चित्रपट मालिकेतील काही शिवगीतांचे सादरीकरण केले. या गीतांना विद्यार्थी, शिक्षक व पालकवर्गाने अत्यंत छान प्रतिसाद दिला. आपल्या मनोगतामध्ये सचिव संग्राम कोंडे यांनी विद्यालयाचा इतिहास व संस्थेची यशस्वी वाटचाल यांचा परिचय करून दिला, तसेच “आपल्या अंगभूत कलागुणांची जोपासना करत नियमित अभ्यासाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले व्यक्तिमत्व खुलवावे” असे प्रतिपादन ही त्यांनी केले.
यानंतर प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गांधी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात छत्रपती शिवरायांच्या ध्येय निष्ठेला आदर्श मानून, हा संस्कार आत्मसात केल्यास राष्ट्रहितासोबत आपली सामाजिक जडघडण प्रभावीपणे करू शकतो, त्यानंतर शिवसेना जिल्हाप्रमुख रमेशबाप्पू कोंडे यांनी आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांना प्रतिकूल परिस्थितीतही मार्गक्रमण करावे, असे प्रतिपादन केले. यानंतर गतवर्षीच्या दहावी व बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेकडून दिला जाणारा आदर्श शिक्षक पुरस्कार महाविद्यालय विभागप्रमुख खोडदे सर यांना प्रदान करण्यात आला आहे.
यानंतर पूर्व-प्राथमिक व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विविध गीतांवर उत्कृष्ट सादरीकरण केले. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी आपले सादरीकरण केले. मनोरंजनासोबत ऐतिहासिक व सामाजिक जागृती या विषयांवरही नृत्य व नाटिका सादर केल्या गेल्या.
कार्यक्रमाच्या शेवटी उपमुख्याध्यापिका भरगुडे मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंजुषा कोंडे मॅडम व अशोक दीक्षित यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांनी प्रयत्न केलं.