छत्तीसगडच्या सक्ती या गावात एका कार्यक्रमामध्ये , 651 ख्रिश्चन कुटुंबे हिंदू धर्मात परतली आहेत ज्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी या कुटुंबांना घरवापसी साठी मदत केली आहे. भाजप नेते प्रबल प्रताप सिंह जुदेव यांचे कुटुंब दोन पिढ्यांपासून या कार्यात गुंतले असून हजारो कुटुंबांना त्यांनी हिंदू धर्मात परतण्यास मदत केली आहे.
सक्ती येथे आयोजित या विशाल हिंदू परिषदेत हवनासह या कुटुंबाचा हिंदू धर्मात परतण्याचा विधी पार पडला. पूजा व शुद्धीकरण हवन करून सर्वांचे पाय गंगाजलाने धुवून, तिलक लावून सर्वांना प्रबळ प्रताप सिंह जुदेव यांनी स्वागत केले. यावेळी सगळ्या कुटुंबांना रामायण ही देण्यात आले .या कार्यक्रमात साध्वी प्रज्ञासह अनेक हिंदू संत सहभागी झाले होते.
ज्या हिंदू कामगारांना ख्रिश्चन बनण्याचे आमिष दाखवण्यात आले तेही या हिंदू परिषदेत सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात प्रबळ प्रताप सिंह जुदेव म्हणाले की , “सनातन संस्कृतीला क्रिप्टो-ख्रिश्चन हिंदूंकडून सर्वात मोठा धोका आहे. हे क्रिप्टो-ख्रिश्चन आपल्या हिंदू समाजात राहतात, फसव्या धर्मांतराला प्रोत्साहन देतात आणि स्लीपर सेलसारखे काम करतात. त्यांचा पर्दाफाश करणे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे.”