इस्रायल डिफेन्स फोर्सेस (आयडीएफ) ने हमासच्या एलिट नुखबा प्लाटूनमधील कमांडर अब्द अल-हादी सबाहच्या खात्माची पुष्टी केली आहे. अब्द अल-हादी सबाह याच्या घरावर ड्रोन हल्ला करत त्याला संपवण्यात आल्याची माहिती इस्रायलकडून जारी करण्यात आली आहे. सबाह याला त्याच्यात घरात, घुसून ठार केले असल्याचे इस्रायलने सांगितले आहे.
अब्द अल-हादी सबाह याच्यावर 7 ऑक्टोबर 2023 रोजी किब्बुत्ज निर ओजवरील हल्ल्याचा आरोप असून, इस्रायलवर करण्यात आलेल्या घातक हल्ल्यांपैकीच हा एक हल्ला होता.ज्यामध्ये 1,200 हून अधिक लोक मारले गेले आणि हमासने 250 हून अधिक ओलीस ठेवले होते.सबा याने यापूर्वीही असंख्य दहशतवादी हल्ल्यांचे नेतृत्व केले असल्याची माहिती आयडीएफने ट्विट करत दिली आहे.
IDF च्या अधिकृत माहितीपत्रकानुसार अब्द अल-हादी सबाह याच्यावर गाझाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या खन युनिस प्रांतामध्येही मोहीम राबवली गेली. या मोहिमेमध्ये इस्रायलला गुप्तचर यंत्रणेसह इस्रायली सुरक्षा यंत्रणेनं मोठं योगदान देत संयुक्तरित्या ही मोहीम फत्ते केली. इथं एका लोकवस्तीमध्ये सबाह लपला होता.इथूनच तो हमासच्या कैक दहशतवादी कारवायांना अंतिम रुप देत होता. आयडीएफने शिन बेटसह संयुक्त कारवाईत दक्षिण गाझामधील खान युनिस प्रदेशात ड्रोन हल्ल्यात सबाहला लक्ष्य केले आहे.
हमासने 7 ऑक्टोबरला केलेला हल्ला इस्रायलच्या इतिहासातील सर्वात प्राणघातक हल्ला होता. ज्यामध्ये 1,200 हून अधिक लोक मारले गेले आणि 250 हून अधिक ओलिस घेतले गेले, सुमारे 100 अजूनही बंदिवासात आहेत. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात क्रूरता दिसून आली, या ऑपरेशनमुळे 45,000 हून अधिक पॅलेस्टिनी लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्यामुळे जागतिक चिंता वाढली आहे आणि वारंवार युद्धबंदीची मागणी केली गेली.
येमेनमधील हौथी बंडखोर आणि लेबनॉनमधील हिजबुल्लाह, दोघेही इराणकडून छुपे हल्ले करत इस्रायलविरुद्ध आक्रमणे करत असल्याने संघर्ष वाढला आहे. तेल अवीवला आता बहु-आघाडीच्या युद्धाचा सामना करावा लागत आहे, ज्यामुळे प्रदेशात तणाव वाढत आहे.