अमेरिकेच्या लुईझियाना राज्यातील न्यू ऑर्लिन्स शहरात वर्षाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी हल्ला झाला आहे. यात हल्लेखोराने नवीन वर्षाचा उत्सव साजरा करणाऱ्या लोकांवर पिकअप ट्रक चालवला. बोर्बन रस्त्यावर घडलेल्या या घटनेंमध्ये नवीन वर्षांचे स्वागत करण्यासाठी जमलेला लोकांना शम्सुद्दीन जब्बार या हल्लेखोराने ट्रकने चिरडले आहे . त्यानंतर पोलीस आणि उपस्थित लोकांवरही गोळ्या झाडल्या. या घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला असून सुमारे 30 जण जखमी झाले आहेत. ४२ वर्षीय अमेरिकी नागरिक शम्सुद्दीन जब्बार याने ज्या ट्रकने लोकांना चिरडले त्यावर इसिसचा झेंडा लावण्यात आला होता.
या हल्ल्याबाबत प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार न्यू ऑर्लिन्समधील बोर्बन रस्त्यावर नवीन वर्षाचा उत्सव साजरा होत असताना एक वेगवान वाहन गर्दीत घुसले. यानंतर एक व्यक्ती त्यातून खाली उतरली. त्याने लोकांवर गोळीबार सुरू केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिस दलालाही गोळीबार करावा लागला.
पोलिसांच्या कारवाईत हल्लेखोर ठार झाल्याचे बोलले जाते. परंतु, त्यासंदर्भात कुठलेही अधिकृत वक्तव्य पुढे आलेले नाही. ही घटना अपघात नसून मुद्दाम करण्यात आलेला हल्ला असल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे. दरम्यान या हल्ल्यानंतर पोलिसांनी जखमींना तत्काळ शहरातील 5 रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे.
. या गाडीच्या चालकाने अधिकाऱ्यांवर देखील गोळ्या झाडल्या असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या दरम्यान दोन अधिकाऱ्यांना गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाचा तपास एफबीआय करत असून घटनास्थळी आईडी सापडल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचाही तपास सुरू आहे.
यापूर्वी जर्मनीतही 25 डिसेंबर रोजी असाच प्रकार घडला होता. मॅग्डेबर्ग शहरातील बाजारपेठेत सौदीतील एका डॉक्टरने लोकांवर कार चालवली होती. त्यात 5 जणांचा मृत्यू झाला असून 200 हून अधिक लोक जखमी झाले झाले होते.