भाजपने गुरुवारी 29 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी निवडणूक पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे . या राज्यांमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांच्या निवडणुका होणार आहेत. विनोद तावडे यांच्याकडे छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांच्याकडे बिहारची, शिवराज सिंह चौहान यांच्याकडे कर्नाटकची आणि पीयूष गोयल यांच्याकडे उत्तर प्रदेशची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
याशिवाय गुजरातसाठी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, उत्तर प्रदेशसाठी पीयूष गोयल आणि मध्य प्रदेशसाठी धर्मेंद्र प्रधान यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते या राज्यांतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय परिषद सदस्यांची निवड करतील.
याशिवाय राज्यांमध्ये जिल्हाध्यक्षांचीही निवडणूक होणार आहे. यानंतर राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीची प्रक्रिया सुरू होणार असून जानेवारी अखेर भाजपच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षाची घोषणा केली जाणार आहे.
पक्षाच्या घटनेनुसार 50 टक्के राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण कराव्या लागतात. 15 जानेवारीपर्यंत मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार असल्याची माहिती लडाख भाजपचे सरचिटणीस पीटी कुंजांग यांनी दिली