विविध परिस्थितीत सनातन धर्मातून धर्मांतर करून इतर धर्मात गेलेले शेकडो लोक आता महाकुंभ परिसरात स्वधर्मात परतणार आहेत. अशी माहिती अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत रवींद्र पुरी देत म्हणाले आहेत की, संपूर्ण भारतातून हजारो लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. ज्यांच्या पूर्वजांनी हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन किंवा इस्लाम धर्म स्वीकारला अशा अनेक लोकांना आता परत यायचे आहे. यासाठी खास घरवापसी योजना तयार करण्यात आली आहे.
साधू-संतांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडणार आहे.पूर्वी हिंदू असलेले हे लोक आता मुस्लीम किंवा ख्रिश्चन झाले होते.मात्र महाकुंभात सहभागी होऊन आपल्या पूर्वजांच्या सनातन धर्म आणि संस्कृतीशी पुन्हा संबंध जोडण्यास ते उत्सुक आहेत. ही घरी परतण्याची प्रक्रिया पहिल्या स्नानपर्वापासून सुरू होते. संगम स्नानानंतर, हिंदू धर्मात पुन्हा सामील होण्यापूर्वी सहभागींचे वैदिक मंत्र, यम नियम आणि पंचगव्य यांच्याद्वारे शुद्धीकरण केले जाईल.
जे लोक अनेक वर्षांपूर्वी परकीय आक्रमकांच्या अत्याचाराच्या भीतीने, आपले कुटुंब आणि जीव वाचवण्यासाठी सनातन धर्मापासून वेगळे झाले होते ,आणि त्यांना इतर धर्म स्वीकारणे भाग पडले ते मात्र आता त्या कट्टरपंथीयांच्या विचारांमुळे त्रस्त झाले आहेत. आणि ते आता म्हणत आहेत की प्रभू श्रीराम हेच आमचे प्राण आहेत. आणि आम्हाला सनातनमध्ये यायचे आहे. आम्हाला परत घ्या.. असे पुरी यांनी नमूद केले आहे.
आम्ही सर्व या सनातन्यांचे स्वागत करतो आणि त्यांचा आदर करतो, या आणि आदराने, सामंजस्याने एकत्र घेऊन शुद्ध माता गंगेत स्नान करून त्यांना सनातनमध्ये परत सामील करून घेऊ असे ते म्हणाले आहेत.
त्याचवेळी मथुरा वृंदावन धामचे बटुक जी महाराज यांनी सांगितले की त्यांचा मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील लोकांशी देखील याबाबतीत संपर्क झाला आहे.
महाकुंभात शेकडो मुस्लिम हिंदू धर्म स्वीकारू शकतात असा दावा करत एका मौलानाने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहून धर्मांतर थांबवण्यासाठी मदत मागितली आहे. यामुळे कट्टरवाद्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असल्याचे त्याने म्हंटले आहे.
महाकुंभ 13 जानेवारीपासून उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे सुरू होणार असून तो 26 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. या भव्य सोहळ्याला सुमारे 40 कोटी भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. संगमाच्या वाळूवर भाविकांसाठी तंबूंची भव्य नगरी वसवण्यात आली आहे.
महाकुंभात अध्यात्माची ज्योत जागृत करण्यासाठी संत आणि धर्मगुरू दाखल झाले आहेत. यंदा महाकुंभस्थळावरील संतांनी देशभरात सनातन संस्कृतीचा गौरव आणि नैतिकता वाढविण्याचा संकल्प केला आहे.