चीनमध्ये HMPV व्हायरस वेगाने पसरत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावरून झपाट्याने सर्वत्र पसरत आहेत. चीनमध्ये पसरणारा ह्युमन मेटापन्यूमोव्हायरस (HMPV) या श्वसन रोगाचा विषाणू फ्लू आणि COVID-19 च्या लक्षणांशी साधर्म्य साधत असला तरी त्याला आपण घाबरण्याची गरज नसल्याचे मत आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल यांनी व्यक्त केले आहे. ते म्हणाले आहेत. की आरोग्य अधिकारी या विषाणूवर बारीक लक्ष ठेवून आहेत.मात्र आपल्याकडे त्याची फार काळजी करण्याची गरज नाही.
ह्युमन मेटाप्युमोव्हायरस (एचएमपीव्ही) च्या झपाट्याने पसरण्याच्या वृत्तावर शुक्रवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉक्टर गोयल म्हणाले की, काही बातम्या आजूबाजूला फिरत आहेत, ज्यामध्ये चीनमध्ये मेटापन्यूमोव्हायरस वेगाने पसरत असल्याचे म्हटले आहे. मात्र आम्हाला यात चिंताजनक असे वाटत नाही कारण मेटापन्यूमोव्हायरस हा एक श्वसन विषाणू आहे ज्यामुळे सर्दीसारख्या रोगाची लक्षणे दिसून येतात. आणि काही लोकांना ह्या समस्या आहेत ज्यात वृद्ध आणि एक वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांचा समावेश आहे, परंतु हा गंभीर आजार नाही, ज्यामुळे जास्त काळजी करण्याची गरज नाही. हिवाळ्यात भारतात श्वसनाच्या समस्या खूप सामान्य असतात.
#WATCH | Delhi | On HPMV virus outbreak and preparedness of Indian hospitals, Directorate General of Health Services, Dr Atul Goel says, "… Metapneumovirus is like any other respiratory virus that causes common cold, and in very old and very young it could cause flu-like… pic.twitter.com/101vPTolAi
— ANI (@ANI) January 3, 2025
ते पुढे म्हणाले की, देशातील सर्व रुग्णालये कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. बेड आणि ऑक्सिजन सिलेंडर इत्यादी सर्व गोष्टी रुग्णालयात उपलब्ध आहेत. विषाणूजन्य आजारांवर उपचारासाठी फारसे औषध लागत नाही. ते म्हणाले की, ICMR डेटाबेसनुसार, या हिवाळ्यात थंडीमुळे त्रस्त रुग्णांची संख्या फारशी नाही. तसेच कोणतीही असामान्य वाढ दिसून आली नाही. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. ते म्हणाले की आजकाल फ्लूसारखे विषाणू सामान्य आहेत. याला सामोरे जाण्यासाठी आपली रुग्णालये पूर्णपणे तयार आहेत.