उत्तर कोरियात हुकूमशाह किम जोंग उनचा सनकी स्वभाव सगळ्या जगाला माहिती आहे. तो विचित्र आदेश आणि शिक्षा देत असल्याने त्याचा विक्षिप्तपणा नेहमी समोर येत असतो. उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी आपल्या देशातील जनतेसाठी एक अजब फर्मान जारी केले आहे.किम जोंग उन यांनी अमेरिकेत स्ट्रीट फूड म्हणून प्रसिद्ध असलेल्या ‘हॉट डॉग’ खाण्यास बंदी घातली आहे. हॉट डॉग बनवताना किंवा खाताना कोणी आढळले, तर त्याला शिक्षा केली जाणार आहे.
किम जोंग उन यांनी हॉट डॉग’ वर बंदी घालण्याचे कारण अमेरिका असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर कोरियाचा हुकूमशहा पाश्चात्य देशांच्या संस्कृतीशी फारसा जोडलेला नाही, म्हणून तो तिथून येणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर कारवाई करतो. त्यामुळे अमेरिकन संस्कृतीचा प्रभाव थांबवण्यासाठी आता हॉट डॉगवर बंदी घालण्यात आली आहे.अशी माहिती समोर येत आहे. किम जोंग उनचा हा निर्णय पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव करण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे, असे म्हटले जात आहे. यापुढे जर कोणी हॉट डॉग खाताना किंवा बनवताना सापडला, तर त्याला देशातील कुख्यात असलेल्या कामाच्या छावण्यामध्ये शिक्षा भोगावी लागणार आहे.भांडवलशाही संस्कृतीचे प्रतिक मानत यावर बंदी घालण्यात आली आहे.
उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम जोंग उन यांनी अचानक घेतलेल्या या निर्णयाची जगभरात चर्चा सुरू झाली आहे. उत्तर कोरियातील उत्तरकडील प्रांत रयांगगांगमधील एका विक्रेत्याने सांगितले की, बाजारात बुदाए जिगे (हॉट डॉग) बंद झाले आहे. तर अधिकाऱ्यांनी घोषणा केली आहे की, कोणी विक्री करताना दिसले, तर त्याचे दुकान बंद केले जाईल. दरम्यान, उत्तर कोरियामध्ये बंदी घालण्यात आलेले हॉट डॉग हे पहिले अन्न नाही.तर याआधीही हुकूमशहा किम जोंग उन यांनी उमामी मटनाचा रस्सा, कोरियन गरम मिरची पेस्ट, फ्लेक्स, किमची, अमेरिकन स्पॅम, बीन्स आणि बुडे-जिगे यासह अनेक दक्षिण कोरियाई आणि अमेरिकन उत्पादनांवर बंदी घातली आहे.