सध्या देशात मंदिर मशीद याबाबत अनेक ठिकाणी वाद होताना दिसत आहेत. या वादावर उत्तर देताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत की, आपला वारसा पुन्हा मिळवणे ह्यात काहीच गैर नाही. महाकुंभमेळ्यापूर्वी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना योगी आदित्यनाथांनी वक्फ मालमत्तासंदर्भातही टिप्पणी केली आहे.
वारसा परत मिळवणे ही वाईट गोष्ट नाही.तसेच वादग्रस्त वास्तूंना मशीद म्हणू नये. मुस्लिम लीगच्या मानसिकतेवर भारत चालवला जाणार नाही”, असे आदित्यनाथ यांनी शाही जामा मशीद वादाचा संदर्भ देत म्हटले आहे. शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाचा न्यायालयाच्या आदेशानंतर संभलमध्ये हिंसाचार झाला होता. यावर बोलताना आदित्यनाथ यांनी पुराणात भगवान विष्णूचा दहावा अवतार असलेल्या कल्कीचे जन्मस्थान म्हणून संभलचा उल्लेख असल्याचे सांगितले आहे. . संभाल येथे झालेल्या हिंसाचारात पाच जणांचा मृत्यू झाला होता तर २० हून अधिक जण जखमी झाले होते.
“१५५६ मध्ये संभालमधील हरिहर मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले आणि एक वास्तू उभी करण्यात आली. ज्याचा उल्लेख आईना-ए-अकबरीमध्येही आहे”, असेही योगी आदित्यनाथ म्हणाले आहेत.
प्रयागराजमधील महाकुंभ वक्फ जमिनीवर आयोजित केल्याचा दावा एका मौलवीने केल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी संताप व्यक्त केला आहे.“वक्फच्या “कुंभ हे हजारो वर्षांपासून भारताच्या वारशाचे प्रतीक आहे आणि येथे नेहमीच होत आले आहे. मात्र ते वक्फ बोर्ड नसून भूमाफियांचे मंडळ आहे.”असे म्हणत अश्या बहाण्याने घेतलेल्या प्रत्येक इंच जमिनीवर राज्य सरकार पुन्हा दावा करेल.अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली आहे. “जिथे ‘वक्फ’ हा शब्द दिसतो, तेथे मूळ जमीन कोणाच्या नावावर नोंदवली गेली हे तपासले जाईल आणि ती जमिन हक्काच्या मालकांना परत करण्याचा प्रयत्न केला जाईल”असेही आश्वासन योगींनी दिले आहे.