ब्रिटनमध्ये राहून पाकिस्तानी महिलांसाठी आवाज उठवणारी नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफझाई अनेकदा तिच्या विधानांमुळे आणि कृतींमुळे चर्चेत असते. अलिकडेच त्यांनी अफगाणिस्तानातील तालिबान सरकारवर हल्ला चढवला आणि तेथील महिलांची स्थिती दयनीय बनवल्याचा आरोप केला. तसेच त्यांनी तिथल्या महिलांना तालिबान सरकारच्या धोरणांना आव्हान देण्याचे आवाहन केले आहे.
मलाला म्हणाली की तालिबान मुलींना शिक्षण घेण्यापासून रोखत आहे.मलाला एका शैक्षणिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पाकिस्तानातील इस्लामाबाद येथे आली होती, यावेळी, मलालाने तिच्या निवेदनात तालिबानवर लिंगाच्या आधारावर भेदभाव केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, अफगाणिस्तानात महिलांचे हक्क चिरडण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
इस्लामाबाद येथे मुलींच्या शिक्षणावर आयोजित एका परिषदेत बोलताना मलालाने अफगाणिस्तानातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा पाढाच वाचला आहे. त्या म्हणाल्या जगात आज महिला सर्वच क्षेत्रात पुरुषाच्या बरोबरीने काम करीत आहेत. कारण महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळाला आहे. त्यामुळे शिक्षण घेऊन महिलांनी स्वतःची त्यांच्या देशाची प्रगती केली. पण तालिबानी शासन कर्त्यांनी महिलांना खिडकीतून बाहेर बघण्यावरही निर्बंध घातले आहेत. हा एक प्रकारचा तुरुंगवास आहे. म्हणूनच अशा क्रूर शासनकर्त्यांना जगणे मान्यता देऊ नये असे मलालाने सांगितले आहे .
तालिबान धर्म आणि संस्कृतीच्या नावाखाली महिलांचे हक्क चिरडण्याचा प्रयत्न करते. हे आपल्या धर्माच्या तत्वांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे.असे म्हणत त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. सध्या तालिबान ही जगातील एकमेव राजवट बनली आहे जिथे मुली आणि मुलांना सहावीच्या पुढे शिक्षण घेण्याचे स्वातंत्र्य नाही, असे करून सुमारे दीड दशलक्ष लोकांना जाणूनबुजून शिक्षणाच्या अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे असा आरोप मलाला यांनी केला आहे.
२०२१ पासून तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता काबीज केली आहे. तेव्हापासून तिथे महिलांचे जीवन खूप कठीण झाले आहे, त्यांच्यावर अनेक तालिबानी नियम लादले गेले आहेत. आतापर्यंत जगातील कोणत्याही देशाने अफगाणिस्तानातील तालिबानला मान्यता न देण्याचे हे देखील एक प्रमुख कारण आहे.
मलाला स्वतःही तालिबानच्या गोळ्यांनी लक्ष्य झाली होती; २०१२ मध्ये, जेव्हा ती फक्त १५ वर्षांची होती, तेव्हा दहशतवाद्यांनी तिच्या डोक्यात गोळी झाडली. यानंतर, मलालाला ब्रिटनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले जिथे तिच्यावर उपचार करण्यात आले होते.