दिल्लीतील काँग्रेस पक्षाचे नवीन मुख्यालय तयार झाले असून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी त्याचे आज उद्घाटन केले आहे. यावेळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत पक्षाचा ध्वज फडकवण्यात आला आहे. काँग्रेसच्या नवीन मुख्यालयाचा पत्ता इंदिरा गांधी भवन, ९ए कोटला रोड आहे. पूर्वी काँग्रेसचे मुख्यालय २४ अकबर रोड येथे होते. हे कार्यालय २५२ कोटी रुपये खर्चून बांधण्यात आल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेसने आपल्या नवीन मुख्यालयाचे नाव माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नावावरून ठेवले आहे. हे भाजप मुख्यालयापासून ५०० मीटर अंतरावर आहे.
२००९ मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांनी त्याची पायाभरणी केली होती आणि १५ वर्षांनंतर ही इमारत पूर्ण झाली आणि आज तिचे उद्घाटन झाले आहे. या नवीन काँग्रेस मुख्यालयात छायाचित्रांद्वारे काँग्रेसचा इतिहास दाखवण्यात आला आहे. या छायाचित्रांमध्ये नरसिंह राव, सीताराम केसरी आणि प्रणव मुखर्जी यांच्यासोबत गुलाम नबी आझाद यांचा फोटो लावण्यात आला आहे.
#WATCH | Congress MP Sonia Gandhi inaugurates the new party headquarters in Delhi, in the presence of party president Mallikarjun Kharge, MP Rahul Gandhi and other prominent leaders of the party pic.twitter.com/6d9LoBEt8a
— ANI (@ANI) January 15, 2025
काही कार्यकर्त्यांनी आधीच काँग्रेस भवनला नाव देत सरदार मनमोहन सिंग भवन असे पोस्टर लावून टाकले होते.त्यानंतर कार्यालयाच्या नावाबाबत एक नवीन वाद सुरू झाला आहे. मात्र या वादावर पडदा टाकत काँग्रेस नेते अनिल शास्त्री म्हणाले की, २००९ मध्येच मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात या इमारतीचे नाव इंदिरा गांधी भवन असे निश्चित करण्यात आले होते.
काँग्रेसचे हे नवीन मुख्यालय आधुनिक सोयीनी सुसज्ज असून कॉर्पोरेटप्रमाणे दिसणारी ही सहा मजली इमारत आहे.