अभिनेता सैफ अली खान याच्यावर मध्यरात्री २ च्या सुमारास वांद्रे पश्चिम येथील सद्गुरू सरण इमारतीतील त्याच्या राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात तो जबर जखमी झाला असून त्याच्यावर सहावेळा वार करण्यात आले असून मणक्याजवळ खोल जखम झाल्याची माहिती समोर आली आहे. प्राथमिक माहितीच्या आधारे चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या अज्ञात व्यक्तीने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.
सैफ अली खानला त्याच्या घरातील कर्मचाऱ्यांनी रात्री साडेतीन वाजता रुग्णालायत दाखल केले तेव्हा चोराने त्याच्या पाठीत खुपलेला चाकू तसाच होता. शस्त्रक्रिया करुन हा चाकू बाहेर काढण्यात आला असून सैफची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. सैफच्या मानेजवळ 10 सेंटीमीटर खोल जखम झाली असल्याची माहितीही समोर आली होती.
काही वेळाने लिलावतीकडून अधिकृतपणे मेडिकल बुलेटीन जारी करण्यात येणार आहे.यानंतर लीलावती रुग्णालयात त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी पार पडली आहे. “सैफला सहा जखमा झाल्या आहेत, त्यापैकी दोन जखमा खोल आहेत. एक जखम त्याच्या मणक्याजवळ झाली आहे. आम्ही त्याच्यावर शस्त्रक्रिया करत आहोत” असे लीलावती रुग्णालयाचे सीओओ डॉ निरज उत्तमणी म्हणाले आहेत. अडीच तासानंतर ही शस्त्रक्रिया पार पडली असून सध्या सैफचे तब्येत स्थिर असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
या हल्ल्यामध्ये सैफच्या घरी काम करणारी एक महिला कर्मचारीही जखमी झाली असून तिच्यावरही उपचार सुरु आहेत. मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीरतेने दखल घेतली असून चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक कामाला लागले आहे.