१३ जानेवारी पासून सुरू झालेल्या प्रयागराज कुंभमेळा २०२५ मध्ये आता पर्यंत ३ कोटी पेक्षा जास्त भाविकांनी सहभाग घेतला आहे.
या कुंभमेळ्याचे वैशिष्ट्य म्हणजे हा कुंभमेळा प्लास्टिकमुक्त आणि पर्यावरण पूरक होत आहे. देशभरातून तब्बल एक कोटी स्टीलचे ताट आणि एक कोटी सुती कापडाची पिशवी एकत्रित करून कुंभमेळा ठिकाणी पोहोचविल्या आहेत. दररोज लाखो जेवण याच प्लेट मध्ये होत आहेत. याच परिसरात सुती कापडाची पिशवी वापरून प्लॅस्टिक पिशवीची गरज पूर्ण केली जात आहे.
चार हजार एकराच्या कुंभमेळा परिसरात तीन लाख अस्थायी शौचालय उभारले आहेत. तसेच हजारो स्वयंसेवी संस्थांच्या मार्फत साफसफाई केली जात आहे.त्यामुळे आपल्या भागातही पंगती, सप्ताह, सामूहिक भोजनात अशा प्रकारे प्लॅस्टिक द्रोण, पात्र या ऐवजी असे ताट वापरणे अत्यावश्यक झाले आहे. या प्लास्टिक पत्रावळी, द्रोण यामुळे आपले सार्वजनिक ठिकाण प्रचंड प्रदूषित झाले आहेत शिवाय आपल्या आरोग्यासाठीही ते घातक आहे.
आपल्या व्यक्तिगत जीवनातही आपण प्लॅस्टिक कमीत कमी वापरण्याचा संकल्प करू हाच प्रयागराज कुंभमेळ्याच्या संदेश आहे.