भारत व नेपाळ या दोनच देशात सनातन धर्म पाळला जात आहे.त्यामुळे सनातन धर्मातील हिंदू,साधू,नाथ धर्म,मंदिरे नष्ट करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आज ना उद्या, अशी परिस्थिती निर्माण होईल.त्यामुळे आता तरी हिंदूनी संघटीत होऊन, सनातन धर्म पुढे चालवला पाहिजे.छत्रपती शिवाजी महाराज यांनीहिंदू धर्माचा वारसा पुढे चालविलाआहे.आपण त्यांचे वंशज नाही का? असा सवाल करत हिंदू धर्म नष्ट करण्यापासून वाचविला पाहिजे.त्यासाठी आपण संघटित होणे गरजेचे आहे.देशाचे रक्षण हा जवान करतो, गावाचे रक्षण चौकीदार करतो,तर सनातन धर्मांचे रक्षण हिंदूंना करायचे आहे,असे प्रतिपादन नाथ आखाडाचे अध्यक्ष बालकनाथ महाराज यांनी केले आहे.
धर्म जागरण ट्रस्ट आयोजित नाथ जागृत यात्रेचा प्रारंभ अहिल्यानगर तालुक्यातील मांजरसुंबा येथील गोरक्षनाथ गडावरून झाला.यावेळी नाथ आखाडाचे अध्यक्ष योगी बालक नाथ महाराज यांच्या हस्ते रथ पादुका पूजन व महाआरती करण्यात आली यावेळी ते बोलत होते. ही यात्रा गोरक्षनाथ गडावरून श्री क्षेत्र मढी, व मायंबा येथे जाणार आहे.यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत संघ चालक नाना जाधव, धर्म जागरण ट्रस्ट ज्ञानेश्वर महाराज दाभाडे, श्री क्षेत्र गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव कदम, श्रीक्षेत्र मढी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष संजय मरकड, श्रीक्षेत्र मायंबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दादासाहेब चितळे आदीसह भाविक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
योगी बालकनाथ महाराज पुढे म्हणाले,देश स्वतंत्र होऊन ७७ वर्ष झाले आहे.मात्र,आपली संस्कृती, हिंदू धर्म वाचविण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे, ही खेदाची बाब आहे. सनातन धर्म वाढविण्यासाठी गोरक्षनाथ महाराजांनी उपदेश केला होता. आज तपोभूमी वर येण्याचा योग मिळाला हे माझे भाग्य आहे. त्यामुळे सनातन धर्म आपण पुढे चालविला पाहिजे. हिंदू धर्मांतर रोखण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. तसेच ज्यांनी धर्मांतर केले त्याना आपल्या धर्मात पुन्हा घेऊन यावे यासाठी प्रयत्न करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.सोमनाथ झाडे म्हणाले, सध्या नगर जिल्ह्यासह इतर भागात हिंदूच्या जागेवर वक्का बोर्ड ताबा मारण्याचा प्रयत्न करत आहे. हे रोखण्यासाठी तसेच हिंदू धर्मांतर थांबविण्यासाठी नाथांचा जागरण यात्रा सुरू केली आहे
नाना जाधव म्हणाले, भारत देश हा युवांचा देश म्हणून ओळखला जातो. हिंदू धर्मावरील आक्रमण रोखण्यासाठी तसेच लहू जिहाद, धर्मांतरण, भूमी जिहाद रोखण्यासाठी ही यात्रा आयोजित केली आहे. त्यामुळे समाजाने जागे होऊन मठ, मदिर यात न पडता हिंदू धर्म जागविण्यासाठी परिवर्तन केले पाहिजे. तसेच मांजरसुंभा येथील गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्ट, मढीयेथील कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट, व मायबा देवस्थान ट्रस्ट या तिन्ही संस्थांनी एकत्र येऊन सनातन धर्मासाठीप्रयत्न करून हिंदू धर्म वाढवावा असे सांगितले.
दाभाडे महाराज म्हणाले, मढी ही आमची जागा आहे, असा दावा वक्फ बोर्डने केला आहे. त्यामुळे आता झोपलेल्या हिंदूना जागे करण्यासाठी बालक नाथ महाराज गोरक्षनाथ गडावर आले आहेत. आज्ञानाची काजळी काढून हिंदूनी पुढे आले पाहिजे. त्यासाठी ही हिंदू जागरण यात्रा आयोजित करण्यात आली आहे.ही यात्रा दोन दिवसांची नसून अखंड यज्ञ चालवाय चा आहे, असे ही दाभाडे महारज यांनी सांगितले आहे. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.