आधीपासूनच तुरुंगात असलेल्या माजी पंतप्रधान आणि पीटीआय पक्षाचे संस्थापक इम्रान खान यांच्या अजून एक मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानच्या एका न्यायालयाने एका जुन्या भ्रष्टाचार प्रकरणात माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना दोषी ठरवत खान यांना १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. या दोघांवर राष्ट्रीय तिजोरीचे 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.
पाकिस्तानी कोर्टाने इम्रान खान यांना अलकादिर ट्रस्ट प्रकरणात 14 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे आहे.तर त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना सात वर्ष कारागृहाची शिक्षा देण्यात आली आहे. भ्रष्टाचाराशी संबंधित हे प्रकरण आहे. न्यायाधीश नासिर जावेद राणा यांनी अडियाला तुरुंगात या शिक्षेची घोषणा केली आहे. इम्रान खान हे आधीपासूनच तुरुंगात असल्याने जेलमध्ये अस्थायी कोर्ट बनवण्यात आले होते. दोघांना प्रत्येकी 10 लाख आणि 5 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे.
खान ऑगस्ट २०२३ पासून तुरुंगात आहेत, त्यांच्यावर सुमारे २०० खटले दाखल आहेत तर बुशरा बीबी यांच्याविरुद्धची शिक्षा निलंबित झाल्यानंतर त्यांची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली होती.