पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. “महाराष्ट्राच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी त्यांच्या वचनबद्धतेसाठी त्यांचा सर्वत्र आदर केला जातो आणि त्यांची आठवण ठेवली जाते,” असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हणले आहेत. समाजाच्या कल्याणासाठी आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी बाळासाहेब ठाकरे नेहमीच वचनबद्ध होते. त्यांनी आपल्या ठाम विचारांबाबत कधीच तडजोड केली नाही. तसेच भारतीय संस्कृतीचा अभिमान वाढवण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे.
I pay homage to Balasaheb Thackeray Ji on his birth anniversary. He is widely respected and remembered for his commitment to public welfare and towards Maharashtra’s development. He was uncompromising when it came to his core beliefs and always contributed towards enhancing the…
— Narendra Modi (@narendramodi) January 23, 2025
२३ जानेवारी १९२६ रोजी जन्मलेले बाळासाहेब हे शिवसेनेचे संस्थापक होते. हिंदू हृदय सम्राट म्हणून ओळखले जाणारे बाळा साहेब यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात व्यंगचित्रकार म्हणून केली. १९६० मध्ये राजकारणात प्रवेश केला. सर्वप्रथम त्यांनी ‘मार्मिक’ नावाचे साप्ताहिक वृत्तपत्र प्रकाशित केले. यानंतर, त्यांनी ‘मराठी माणसांच्या’ हक्कांसाठी लढण्यासाठी शिवसेना स्थापन केली. बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः कधीही निवडणूक लढवली नाही तरीही एक काळ असा होता की महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचा निर्णय अंतिम मानला जात होता.
बाळासाहेब ठाकरे हे धाडसी नेते होते. त्यांचे विचार कणखर आणि भाषणे नेहमीच प्रभावी आणि प्रखर होती.त्यांच्या भाषणांनी प्रत्येक श्रोत्यावर अमिट ठसा ठेवला.त्यांच्या भाषणांची अशी धार असायची की, ते ऐकणारा प्रत्येक व्यक्ती मंत्रमुग्ध होऊन जात असे.90 च्या दशकात त्यांनी हिंदुत्त्ववादाची भूमिका घेतली होती. बाबरी मशिद पाडल्यानंतर देशात जो गदारोळ माजला होता त्यावेळी बाळासाहेबांनी सर्वांसमोर जाहीर केले होते की, जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी मशिद पाडली असेल तर मला त्यांचा गर्व आहे.