आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी ध्वजावंदन करण्यात आले.
तर शिवसेना नेते भरत गोगावले यांनी खरवली काळीज ग्रामपंचायतमधील आवारात प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. भरत गोगावले यांनी त्यांच्या होम ग्राउंडवर झेंडावंदन केले. तसेच, सर्व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे रायगडचं पालकमंत्रीपद हुकले तरी देखील भरत गोगावलेंनी प्रजासत्ताक दिनी झेंडावंदन केल्याचे दिसून आले.
परभणी येथे पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते 76 व्या ध्वजारोहण संपन्न झाला प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा संकुल येथे मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला. पोलीस दलाकडून मानवंदना देण्यात आली.तर पुण्यात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शिवाजीनगर पोलीस मैदानावर ध्वजवंदन करण्यात आले आहे.
जालन्यात 76 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला असून पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न झाले आहे. यावेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर, जिल्हाधिकारी श्रीकृष्ण नाथ पांचाळ पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल यांच्यासह प्रशासनातील अधिकारी उपस्थित होते.
विधान भवन, मुंबई येथे आज भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७६व्या दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी, विधानमंडळ सचिवालयाचे सचिव जितेंद्र भोळे, विलास आठवले यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.