राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये उभी फुट पडल्यावर आणि ४० पेक्षा अधिक आमदारांनी अजित पवार यांच्यानेतृत्वावर विश्वास टाकत वेगळी चूल मंडळी होती. अजित पवार यांनी देखील भाजपसोबत संधान साधल्यानंतर पक्षाचं घड्याळ हे चिन्ह आपल्याच ताब्यात आहे असं दाखवलं त्यामुळे सध्या घडयाळ हे चिन्ह राष्ट्रवादी अजित पवार यांच्या ताब्यात आहे. आता नेमकं हे चिन्ह कुणाच? यावर बराच काळ खल सुरू होता. प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं. आज राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाबाबात सर्वाच्च न्यायालय दिल्ली येथे सुनावणी पार पडणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर या प्रकरणाची सुनावणी झाली नव्हती. बराच काळ सुनावणी लांबली होती. शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांच्या पक्षाला देण्याच्या निर्णयाविरोधात शरद पवार यांच्या गटाने सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आज या प्रकरणावर सुनावणी होणार असल्याने सर्वांचे लक्ष या सुनावणीकडे लागलेले आहे.
शरद पवार गटाने दाखल केलेल्या याचिकेत विधानसभा निवडणुकीच्या आधी अजित पवार हे प्रचारात शरद पवार यांचा फोटो आणि नाव वापरत असल्याचा युक्तीवाद शरद पवारांच्या वकिलांनी केला होता. त्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि अजित पवार यांच्या पक्षाला अपेक्षेपेक्षा खूप चांगले यश मिळाले. दरम्यानच्या काळात या प्रकरणी कोणतीच सुनावणी झाली नव्हती. आता आज या प्रकरणाची सुनावणी न्यायापूर्ती सुर्यकांत यांच्या पीठासमोर पार पडलेल्या पडणार आहे. जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही, तोपर्यंत शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हे नाव कायम ठेवण्यास कोर्टाने परवानगी दिली होती.
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत नाव आणि चिन्ह अजित पवार यांच्या गटाला मिळाले. या विरोधात शरद पवार गटाने सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. २२ फेब्रुवारी २०२४ मध्ये निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या गटाला तुतारी वाजवणारा माणूस हे निवडणूक चिन्ह दिले. यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र गटाने अजित पवार यांना दिलेले चिन्ह आणि पक्ष हा निवडणूक आयोगाचा निर्णय अन्याय असल्याचे म्हणत याचिका दाखल केली होती. आता सगळ्यांच्या नजरा निकालावर खिळल्या आहेत.