भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल प्रयागराजला जाऊन कुंभमेळ्यात पवित्र गंगास्नान केले. त्यांच्या या गंगास्नानावर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्रकारांनी विचारले असता कॅमेऱ्यांसमोर संगमामध्ये डुबकी मारण्यासाठी भाजप नेते एकमेकांशी स्पर्धा करत आहेत, असे खरगे यांनी म्हटले होते.
त्यांच्या याचं टिकेवरून आता नवा वाद निर्माण झालेला पहायला मिळतो आहे. कारण याचं वक्तव्यावरून खरगे आता प्रचंड टीकेचे धनी होतांना दिसत आहेत. खरगे यांच्या वक्तव्याचा निषेध राजकीय वर्तुळातून तर होतोच आहे, पण विश्व हिंदू परिषदेकडून देखील खरगे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आले आहे. प्रयागराजमधील संगमात स्नान करण्यावरून भाजप नेत्यांना लक्ष्य करणारे विधान केल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या विधानावर विश्व हिंदू परिषदेने काँग्रेसवर टीका केली. विश्व हिंदू परिषदेने, “काँग्रेसला त्यांच्या श्रद्धेचा ‘अपमान’ केल्याबद्दल लोक माफ करणार नाहीत. असे त्यांनी म्हटले आहे.
विश्व हिंदू परिषदेचे सह-सरचिटणीस सुरेंद्र जैन यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप नेत्यांच्या संगम स्थानाविषयी खरगे यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध केलाय. तसेच काँग्रेस नेहमीच हिंदूविरोधी राहिली आहे आणि जगाला माहिती आहे की त्यांनी हिंदूंना कसे ‘कलंकित’ केले आहे. हे पाप आहे. त्यांना दहशतवादी ठरवून आणि ‘भगवा दहशतवाद’ हा शब्दप्रयोग करून हे कृत्य केले आहे.’ अशी टीका देखील त्यांनी यावेळी केली.
दरम्यान, संगम स्थान आणि अति धार्मिक कृतीमुळे देशातून गरिबी दूर होण्यास मदत होईल का? असा प्रश्न देखील खरगे यांनी उपस्थित केला होता. त्यांच्या या व्यक्तव्याचा देखील जैन यांनी जोरदार निषेध केला आहे. सध्या प्रयागराज येथे महाकुंभमेळा सुरू आहे. तब्बल १४४ वर्षानंतर अशा ऐतिहासिक कुंभमेळा सोहळ्याचा योग आला आहे. म्हणून देश – विदेशातून श्रद्धाळू गोळा होतं गंगा स्थानाचे पुण्य पदरी पडून घेत आहेत. पण भारतातूनच अशी वक्तव्य येऊ लागली तर काय करायचं ? असा सवाल देखील उपस्थित केला जातो आहे.