प्रयागराजमध्ये सुरु असलेल्या कुंभमेळ्यात संगम किनाऱ्यावर मौनी अमावस्येमुळे करोडो भाविकांची अमृत स्नानासाठी गर्दी जमली होती. अचानक गर्दी जमल्याने याठिकाणी चिंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली व चारही बाजूने भाविक या गर्दीत अडकले. या ठिकाणी एवढी भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती की, अनेक भाविकांची या गर्दीत गुदमरून जीव गेल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या गर्दीत १७ भाविकांचा मृत्यू झाला असून, 50 ते 80 भाविक जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करुन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसंच मुख्यमंत्री योगी देखील या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
महाकुभमध्ये चेंगराचेंगरीची बातमी मिळताच स्थानिक प्रशासनाने त्वरित मदत कार्य सुरू केले आणि परिस्थिती नियंत्रित आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या ठिकाणी झालेल्या चेंगराचेंगरीनंतर, निरंजनी आखाड्याची स्नान मिरवणूक थांबवण्यात आली आहे. येथील परिस्थिती पाहता या निरंजनी आखाड्याचे अमृत स्नान पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, महाकुभ नगरपालिका प्रशासनाने भक्तांना संयम ठेवण्याचे आवाहन केले आहे.
महाकुंभमेळ्यातील मौनी अमावस्येचे मुख्य स्नान असल्यामुळे कुंभमेळ्यात संगम किनाऱ्यावर मोठ्या संख्येने भाविक जमले. मध्यरात्री 1 वाजताच्या सुमारास संगम किनाऱ्यावर अचानक गर्दी वाढू लागली. गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली आणि भाविकांनी पळापळ सुरु केली, या पळापळीत अनेकजण खाली पडून जखमी झाले तर काहींना गर्दीत श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने मृत्यू झाला. सध्या या ठिकाणी मदत कार्य सुरु असून, जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, या चिंगराचेंगरीनंतर आखाडा परिषदेने मौनी अमावस्येच्या दिवशी अमृत स्नान होणार नाही असा निर्णय घेतला आहे. आ प्रयागराज महाकुंभात झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, आखाड्याने मौनी अमावस्येला अमृत स्नानाचा कार्यक्रम पूर्णपणे रद्द केला आहे. आज कोणताही आखाडा अमृत स्नान करणार नाही. तसंच आखाड्याने मिरवणूका देखील मागे घेतल्या आहेत.