ISRO 100th launch : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने आणखी एक मोठी कामगिरी करत इतिहास रचला आहे. इस्रोने त्यांच्या १०० व्या मोहिमेचा भाग म्हणून एक नवीन नेव्हिगेशन उपग्रह अवकाशात पाठवला आहे.
आज सकाळी आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपण वाहन जीएसएलव्ही-F15 द्वारे त्यांचे 100 वे उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले आहे. इस्रोचं हे 100 वं ऐतिहासिक प्रक्षेपण ठरल आहे. इस्त्रोच्या या यशाचे सर्व देशभरातून कौतुक होत आहे. या प्रक्षेपणाची माहिती इस्रोने आपल्या X अकाउंटवरून दिली आहे. इस्रोचे नवे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर आणि या वर्षातील इस्रोचे हे पहिलेच मिशन होते.
१०० व्या मिशनच्या यशाबद्दल इस्रो प्रमुख व्ही. नारायणन यांनी आनंद व्यक्त करत म्हंटले आहे की, “२०२५ मध्ये इस्रोचा पहिला प्रयत्न यशस्वी झाला आहे ही खूप आनंदाची गोष्ट आहे. NVS 02 उपग्रह यशस्वीरित्या कक्षेत स्थापित करण्यात आला आहे. या मोहिमेचे १०० वे प्रक्षेपण हा एक मैलाचा दगड आहे.”
जीएसएलव्ही-एफ १५ हे भारताच्या जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लाँच व्हेइकलचे (जीएसएलव्ही) १७ वे आणि स्वदेशी क्रायो स्टेजचे ११ वे उड्डाण आहे. स्वदेशी क्रायोजेनिक स्टेजसह जीएसएलव्हीचे हे आठवे ऑपरेशनल उड्डाण आहे. स्वदेशी क्रायोजेनिक स्टेजसह जीएसएलव्ही-एफ 15 एनव्हीएस-02 उपग्रहाला जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये स्थापित करेल, असे इस्रोने एका निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रोच्या या यशस्वी कामगिरीचे अभिनंदन केले आहे. याप्रसंगी ट्विट करत ते म्हणाले, या उपग्रहाच्या लाँचने भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे उज्ज्वल भविष्य दर्शविले आहे.’ तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी देखील ट्विट करत इस्रोला शुभेच्छा दिल्या आहेत.