अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसी डीसीजवळील रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळ जवळ एक भीषण विमान अपघात झाला आहे. पीएसए एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान हवेत असताना या विमानाने लष्कराच्या हेलिकॉप्टरला धडकल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातानंतर विमान पोटोमॅक नदीत पडले असल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघाताचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एअरलाइन्सच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘विमानात ४ क्रू मेंबर्ससह ६४ प्रवासी होते. या अपघातानंतर प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु असून, प्रवाशांना नदीतून बाहेर काढले जात आहे. या अपघातानंतर रेगन नॅशनल विमानतळ बंद करण्यात आलं आहे. दरम्यान, समोर आलेल्या माहितीनुसार, या अपघातात अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अद्याप मृतांचा आकडा समोर आलेला नाही. अजूनही या ठिकाणी रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
https://x.com/i/status/1884794861271867831
अमेरिकेने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘वॉशिंग्टन डीसी डीसीजवळील राष्ट्रीय विमानतळजवळ एक प्रवासी विमान नदीत कोसळले आहे, डीसी धावपट्टीवरून उड्डाण घेताना या विमानाने हवेत एच -60 हेलिकॉप्टरला धडक दिली. या अपघातात विमान नदीत कोसळले आहे. या प्रवासी विमानात ६४ प्रवासी प्रवास करत होते. पीएसए विमानाने ज्या हेलिकॉप्टरला धडक दिली ते अमेरिकन सैन्याचे होते.’
अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी या घटनेची दखल घेत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे, ‘आम्ही परिस्थितीवर नजर ठवून आहोत, लवकरच गोष्टी रुळावर येतील. असे ट्विट त्यांनी केलं आहे.