कॅनेडियन पंतप्रधान जस्टिन ट्रूडो पुन्हा एकदा तोंडावर पडले आहेत. ट्रूडोने यांनी काहीदिवसांपूर्वी भारतावर आरोप करत दहशतवादी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येत भारतीय एजन्सीचा हात असल्याचा आरोप केला होता. मात्र, आरोप करताना त्यांनी कोणताही पुरावा सादर केला नव्हता.
याचदरम्यान, निज्जरच्या हत्येत भारताचा सहभाग असल्याचे कोणतेही पुरावे सापडले नसल्याचा अहवाल कॅनडाच्या परराष्ट्र हस्तक्षेप समितीने सादर केला आहे. समितीच्या या अहवालाने कॅनडाचे सरकार म्हणजेच पंतप्रधान आजपर्यंत जस्टिन ट्रुडो हे खोटं बोलत होते हे सिद्ध झाले आहे.
अहवालात स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, ‘परदेशी संस्थांनी देशाच्या निवडणुकांमध्ये हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु निज्जरच्या हत्येविषयी चुकीच्या माहितीचा प्रसार केल्यामुळे देशाची प्रतिमा खराब झाली. दिशाभूल करणारी माहिती मीडिया आणि सोशल मीडियाद्वारे पसरवली गेली. असं अहवालात सांगण्यात आले आहे.’
गेल्या अनेक काळापासून कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताविरुद्ध विष ओकले आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. पुढे त्यांनी हरदीप निज्जर हत्याकांडात भारताला दोष देत आणखी एकदा भारतावर निशाणा साधला. निज्जरच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचे त्यांनी सांगितले होते. मात्र, त्यांनी कोणताही पुरावा सादर केला नव्हता. आता मात्र, कॅनडाच्या परराष्ट्र हस्तक्षेप समितीने सादर केलेल्या अहवालानंतर ट्रुडो हे तोंडावर पडले आहेत.
दरम्यान, नुकताच जस्टिन ट्रूडो यांना कॅनडाच्या पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. नव्या पंतप्रधानाची निवड होईपर्यंत ट्रूडो आता फक्त काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या पक्षातील नेत्यांनीच त्यांचा पाठिंबा काढून घेतल्याने त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. दुसरीकडे जस्टिन ट्रूडो यांच्या राजीनाम्यामागे वेगवगेळी कारणं असल्याच बोललं जात आहेत.