अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सध्या त्यांच्या नवनव्या निर्णयांमुळे चर्चेत आहेत. अशातच आता त्यांनी ब्रिक्स (BRICS) राष्ट्रांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. ब्रिक्स राष्ट्रे (ब्राझील, रशिया, भारत, चीन व दक्षिण आफ्रिका) त्यांचे नवे चलन सुरू करण्याच्या प्रयत्नात असल्याच्या बातम्या अलीकडच्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवरुन ऐकू येत आहेत या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, चीनसह सर्व ब्रिक्स देशांना थेट धमकी दिली आहे.त्यांनी असे म्हंटले आहे की, ब्रिक्स देशांनी हे समजून घ्यावे की, ते अमेरिकी डॉलरला बदलू शकत नाहीत. जर असे झाले तर ब्रिक्स सदस्य देशांवर १०० टक्के कर लावला जाईल, असे धमकीच्या स्वरात म्हटले आहे.
ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिले आहे की,”ब्रिक्स देश अमेरिकी डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्याचे प्रयत्न करत आहेत.पण आता हे चालणार नाही. विरोधी देशांनी अमेरिकी डॉलरच्या वर्चस्वाला आव्हान देण्यासाठी ब्रिक्सचे चलन आणू नये, तसेच कोणत्याही इतर चलनाना पाठिंबा देऊ नये. जर असे केले गेले नाही, तर ब्रिक्स देशांवर १०० टक्के कर लावण्यात येईल”, अशी धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी ब्रिक्स देशांना दिली आहे .तसेच या देशांसाठी अमेरिकेच्या बाजाराचे दरवाजे बंद होतील.अशीही धमकी ट्रंप यांनी दिली आहे.
The idea that the BRICS Countries are trying to move away from the Dollar, while we stand by and watch, is OVER. We are going to require a commitment from these seemingly hostile Countries that they will neither create a new BRICS Currency, nor back any other Currency to replace…
— Donald J. Trump Posts From His Truth Social (@TrumpDailyPosts) January 31, 2025
डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतरच ब्रिक्स देशांना इशारा दिला होता. ब्रिक्स देशांनी अमेरिकेविरोधात धोरणे आणली तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील. या देशांनी अमेरिकेच्या हिताच्या विरोधात अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला आहे जर यापुढेही हे देश असेच करत राहिले तर त्यांच्यासोबत जे होईल, त्यानंतर ते आनंदी राहू शकणार नाहीत, असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता.
ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांचा समावेश आहे. या गटाला अमेरिकन डॉलरवरील जागतिक अवलंबित्व कमी करायचे आहे. ब्रिक्स देश ब्रिक्स चलनाच्या मदतीने आपला व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहेत. रशिया आणि चीन आधीच डॉलरऐवजी युआन आणि इतर चलनांमध्ये व्यापार करत आहेत.इतरही राष्ट्रांनी डॉलरऐवजी ब्रिक्स चलन स्वीकारण्यास सुरुवात केली तर अमेरिकन अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो.