आज म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प संसदेत सादर होणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प सादर करतील. यासह, त्या सलग आठव्यांदा अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम करणार आहेत. या अर्थसंकल्पाच्या सादरीकरणासह सीतारमण माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी वेगवेगळ्या काळात सादर केलेल्या 10 अर्थसंकल्पांच्या विक्रमाच्या जवळ पोहचतील.
आजच्या बजेटमधून काही विशेष घोषणा अपेक्षित आहेत. सामान्य लोकांपासून कॉर्पोरेट जगापर्यंत या बजेटची उत्सुकतेने प्रतीक्षा आहे. आजच्या या बजेटमध्ये महागाई आणि टॅक्सवर मोठ्या सवलतीची घोषणा होऊ शकते. याअर्थमंत्री निर्मला सिथारामन सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करतील.
बजेटमध्ये काय होईल?
अर्थसंकल्पातविकासावर विशेष लक्ष दिले जाईल. तसेच रेल्वे, बंदर आणि विमानतळावरील भांडवली खर्च वाढू शकतो. मध्यमवर्गासाठी अनेक पावले उचलली जाऊ शकतात. आयकरात मोठ्या बदलांची अपेक्षा आहे डिडक्शन 75000 रुपयांवरून 1 लाखांपर्यंत वाढविणे अपेक्षित आहे. 20 टक्के आणि 30 टक्के स्लॅबमध्ये बदल होऊ शकतो. मात्र, कॉर्पोरेट करात थेट दिलासा मिळण्याची शक्यता कमी आहे.
पेन्शनवर काय घोषणा केली जाऊ शकते ?
अर्थसंकल्पात पेन्शनवर देखील मोठी घोषणा होऊ शकते. एनपीएस, ईपीएस आणि यूपीएस सारख्या पेन्शन योजनांविषयी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा शक्य आहेत.
रेल्वेचे काय होईल?
अर्थसंकल्पात 100 अमृत भारत गाड्या आणि 10 हून अधिक वंदे भारत गाड्यांची घोषणा होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त, नॉन -एसी कोचची संख्या वाढविण्यासाठी देखील घोषित केली जाऊ शकते. वित्तीय वर्ष 2025-26 साठी रेल्वेला 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त वाटप केले जाऊ शकतात.