Union Budget 2025 : अर्थमंत्री निर्मला सीतारमन (Nirmala Sitharaman) यांनी आज म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा पूर्ण अर्थसंकल्प संसदेत सादर करत आहेत. नेहमीप्रमाणे या अर्थसंकल्पात देखील अर्थमंत्र्यांनी खास साडी परिधान केली आहे. यावेळी त्यांच्या साडीची विशेष चर्चा होत आहे. त्यांच्या या साडीचे बिहार राज्याशी खास कनेक्शन आहे.
आजच्या खास दिवशी अर्थमंत्र्यांनी खास मधुबनी कला साडी परिधान केली आहे. या साडीच्या माध्यमातून त्यांनी मधुबनी कलेबद्दल आदर व्यक्त केला व त्यास प्रोत्साहन देण्याचा एक संदेश दिला आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का? की, सीतारमन यांना ही साडी कोणी दिली आहे.
सीतारमन यांनी परिधान केलेली ही साडी त्यांना दुलारी देवी यांनी दिली आहे. ही साडी दुलारी देवी यांनी स्वतःच्या हाताने बनवली आहे. दुलारी देवी ह्या एक प्रसिद्ध मिथिला कलाकार आहेत. विशेष म्हणजे त्यांना पद्म पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आल आहे. मिथिला कला सन्मान कार्यक्रमात अर्थमंत्री यांची दुलारी देवी यांच्याशी भेट झाली होती. या कार्यक्रमात दुलारी देवी आणि सीतारमन यांच्यात विशेष संभाषण झालं होत त्यात त्यांनी या मधुबनी कलेवर विशेष चर्चा केली होती. त्यांच्या या भेटीनंतर दुलारी देवी यांनी त्यांना ही विशेष साडी भेट दिली आणि त्यांनी ती बजेटच्या दिवशी परिधान करावी अशी इच्छा व्यक्त केली आहे.
दुलारी देवी कोण आहेत?
बिहारच्या दुलारी देवी ‘मधुबनी की दुलारी’ म्हणूनही ओळखल्या जातात. त्या मच्छीमार समुदायातील आहेत, त्यांच्या समाजात क्वचितच काहीजण आपली कला जपतात त्यातील एक नाव म्हणजे दुलारी देवी. आपल्या कलेच्या बळावर त्यांनी त्यांची एक विशेष ओळख निर्माण केली आहे.
दुलारी देवी यांनी त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणींचा सामना करत इतपर्यंतचा प्रवास केला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांना त्यांच्या नवऱ्याने सोडलं व त्यांनी आपलं मुलंही गमावलं, या सगळ्यावर मात करत त्यांनी घर काम करत कलेच्या दिशेने प्रवास सुरु ठेवला. त्यांना 2021 मध्ये तत्कालीन अध्यक्ष राम नाथ कोविंद यांनी पद्म पुरस्काराने सन्मानित केल आहे.