अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शनिवारी (दि.१ फेब्रुवारी) संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय नोकरदारांना मोठा दिलासा दिला आहे. अर्थसंकल्प सादर करताना सातारमन यांनी सांगितले होते की, भारतीय अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी, सर्वसमावेशक विकास, लोकांच्या भावना आणि मध्यमवर्गीयांच्या आकांक्षांना न्याय देण्याच्यादृष्टीने यंदाचा अर्थसंकल्प तयार करण्यात आला आहे.’ त्यांनी म्हंटल्याप्रमाणे सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात या गोष्टी दिसून आल्या असं म्हणायला आता हरकत नाही.
अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी मोठी घोषणा केली. यावेळी त्यांनी १२ लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त करण्यात असल्याची घोषणा करत सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे. त्यांच्या या घोषणेमुळे नोकरवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी त्या म्हणाल्या, पुढील आठवड्यात नवीन आयकर कायदा केला जाईल. यासाठी एक विधेयक आणले जाईल. ६३ वर्षे जुन्या आयकर कायद्याची जागा घेणारा हा नवीन कायदा दोन भागात बनवला जाईल.
आता कर रचना कशी असणार ?
० ते ४ लाख रुपये – कर नाही
४ ते ८ लाख रुपये – ५ टक्के
८ ते १२ लाख रुपये – १० टक्के
१२ ते १६ लाख रुपये – १५ टक्के
१६ ते २० लाख रुपये – २० टक्के
२० ते २४ लाख रुपये – २५ टक्के
२४ लाख रुपयांपेक्षा अधिक – ३० टक्के