Mumbai News : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी नुकताच लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. शिक्षण, उद्योग, शेतकरी या विभागात सकारात्मक घोषणा करण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त आरोग्य क्षेत्रात सुद्धा अनेक सकारात्मक घोषणा करण्यात आल्या आहेत.
कोरोना काळानंतर आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. नागरिकांना अनेक आजरांची लागण होत आहे. तसंच कॅन्सरच्या रुग्णांमध्ये देखील वाढ झाली आहे. अशा आजारांवर मात करताना सर्वसामान्य नागरिकांचं कंबरड मोडून जात. ही परिस्थितीत लक्षात घेता, सरकारने वैद्यकीय उपकरणांबरोबर कॅन्सरवर उपचारासाठी आवश्यक असलेली आणि इतर 36 औषधे स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. औषधांवरील कस्टम ड्युटी हटवली जाणार असून, यामुळे नागरिकांना आता औषधे स्वस्त दरात मिळणार आहेत.
दरम्यान, सरकारी रुग्णालयात डेकेअर कॅन्सर सेंटर उभारण्यात येणार असून, त्यांची संख्या २०० इतकी असणार आहे. हे डे केअर कॅन्सर सेंटर प्रत्येक जिल्ह्यासाठी एक उभारले जाईल अशीही घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी ही दिलासा देणारी बाब आहे. तसंच पाच वर्षात 75 हजार मेडिकलच्या जागा वाढणार असल्याचं जाहीर करण्यात आलय. यासोबतच कर्करोगाशी संबंधित औषधे स्वस्त होतील व वैद्यकीय उपकरणे देखील स्वस्त होणार आहेत.
तसंच ऑनलाईन गिग वर्कर्सकडून पीएम जन आरोग्य योजनेअंतर्गत आरोग्य सेवा पुरवली जाईल. 1 कोटी गिग वर्कर्सला याचा फायदा होणार आहे. पुढील पाच वर्षांत वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये 10 हजार जागा वाढवल्या जाणार आहे.