“आजपर्यंतच्या देशाच्या इतिहासात असा अर्थसंकल्प सादर झालेला नाही. त्यामुळे मी तर म्हणेल की इतिहासातला अत्यंत महत्त्वाचा अर्थसंकल्प देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला आहे. हा अर्थसंकल्प देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. आजवर केंद्र सरकारपायाभूत सुविधाना कायमच प्राधान्य देत होतं. त्या संदर्भातील तरतुदी यंदा वाढवल्या आहे. म्हणून रस्ते निर्मितीच्या क्षेत्रात त्याचा मोठा फायदा होईल. तसेच शेती क्षेत्र आणि शेतकरी आत्मनिर्भर करण्यावर विशेष भर दिला असल्याने हा अर्थसंकल्प खरंच ऐतिहासिक अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
ते पुढे म्हणाले की “आपला देश तब्बल २२ लाख कोटींचे इंधन आयात करतो. लिथियम आयन बॅटरी स्वस्त करण्यात आल्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल स्वस्त होतील. जे एलेक्ट्रीक मटेरियल १५० डॉलर प्रति किलोवॅट प्रती तास होते, ते भविष्यातील १०० डॉलर प्रति किलोवॅट प्रति तासच्या खाली जाईल आणि त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल्स स्वस्त होतील. तसेच त्यामुळे प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर कमी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आयकर संदर्भात नवीन नियम आणून सामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. मध्यम वर्गाचा विचार करून बारा लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त केले आहे. ही खुप दिलासा देणारी बाब आहे, असेही गडकरी पुढे म्हणाले.
दरम्यान, लिथियम-आयन बॅटरी, ईव्ही बॅटरी उत्पादनासाठी ३५ अतिरिक्त भांडवली वस्तू आणि मोबाईल फोन बॅटरी उत्पादनासाठी २८ वस्तूंना मूलभूत सीमाशुल्कातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे भविष्यात इलेक्ट्रिक व्हेईकला चांगले दिवस येण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच हा अर्थ संकल्प ग्रीन अर्थसंकल्प म्हणून गणला जाऊ शकतो, असं यातील तरतुदींवरून सांगता येतं, असं काही जाणकारांना वाटतं.