गेल्या 10 वर्षांत 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढण्यात मोदी सरकार यशस्वी ठरलं आहे. असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मंगळवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील उत्तरात केला. आम्ही गरीबांना खोटी आश्वासने दिली नाही, त्यांचा खरा विकास आम्हीच केलाअसं पंतप्रधान मोदी यांनी आपल्या कालच्या भाषणात म्हंटल आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, “गेल्या 10 वर्षात लोकांनी आम्हाला त्यांची सेवा करण्याची संधी दिली आणि 25 कोटी देशवासीयांनी गरिबीला हरवले आणि गरिबीतून बाहेर आले आहेत. 16 कोटी घरांना नळाचे पाणी दिले आहे आणि गरीब कुटुंबांसाठी 5 कोटी घरे बांधली आहेत. देशाच्या आर्थिक विकासासाठी राबवण्यात आलेल्या या योजनांअंतर्गत लाखो गरीब कुटुंबांना मदत झाली आहे. असंही पंतप्रधान आपल्या भाषणात म्हणाले आहेत.
स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरही सुमारे 16 कोटी कुटुंबांपैकी 75 टक्के कुटुंबांकडे नळाचे कनेक्शन नव्हते. आमच्या सरकारने केवळ पाच वर्षांत 12 कोटी कुटुंबांना त्यांच्या घरात नळाचे पाणी दिले आहे. तसंच गरीब कुटुंबांना 4 कोटी घरे देण्यात आलीत. विशेषत: महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने 12 कोटींहून अधिक शौचालये उपलब्ध करून दिली आहेत. ज्यांना या सुविधांअभावी सर्वाधिक त्रास सहन करावा लागत होता.
गरीबों की झोपड़ियों में फोटो सेशन से अपना मनोरंजन करने वालों को हमारे गरीब भाई-बहनों की बात बोरिंग ही लगेगी! pic.twitter.com/6WXdUuluAf
— Narendra Modi (@narendramodi) February 4, 2025
यावेळी पंतप्रधानांनी त्यांच्या ‘फार्मर्स फर्स्ट’ उपक्रमांवरही प्रकाश टाकला, ज्यामध्ये शेतकऱ्यांना परवडणाऱ्या किमतीत खते देण्यासाठी गेल्या काही वर्षांत एकूण 12 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. तसंच गेल्या दहा वर्षात शेतकऱ्यांचा कसा विकास करण्यात आला यावर देखील भाष्य केलं.
पंतप्रधानांनी त्यांच्या कार्यकाळात वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागांमध्ये झालेल्या झपाट्याने वाढीचाही उल्लेख केला. 2014 मध्ये भाजप सत्तेत येण्यापूर्वी देशात केवळ 387 वैद्यकीय महाविद्यालये होती. आता ही संख्या दुप्पट होऊन 780 वैद्यकीय महाविद्यालये झाली आहेत. असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
2014 मध्ये एसटी विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएसच्या केवळ 3,800 जागा होत्या. आज ही संख्या वाढून अंदाजे 9,000 झाली आहे. 2014 पूर्वी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएसच्या जागा 14,000 पेक्षा कमी होत्या. आज ही संख्या सुमारे 32,000 झाली आहे. म्हणजे 32,000 ओबीसी विद्यार्थी डॉक्टर होतील.
गेल्या दहा वर्षांत दर आठवड्याला एक नवीन विद्यापीठ, दररोज एक नवीन आयटीआय आणि दर दोन दिवसांनी नवीन महाविद्यालय स्थापन झाले आहेत. यामुळे एससी, एसटी आणि ओबीसी तरुणांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला आहे.
पुढे पंतप्रधान म्हणाले, त्यांच्या सरकारने तरुणांच्या आकांक्षांवर लक्ष केंद्रित केल आहे, तरुणांसाठी अधिक संधी निर्माण केल्या आहेत व अनेक क्षेत्रे खुली केली आहेत. याचा परिणाम असा झाला की, भारतातील तरुण आता जागतिक स्तरावर आपली क्षमता दाखवत आहेत.
मध्यमवर्गीयांना मिळणाऱ्या फायद्यांचा उल्लेख करताना पीएम मोदी म्हणाले की, ‘2013-14 मध्ये आयकर सूट मर्यादा फक्त 2 लाख रुपये होती, ती आता 12 लाख रुपये करण्यात आली आहे. यामुळे आता 12.75 लाख रुपयांपर्यंत कमाई करणाऱ्यांना संपूर्ण कर सवलत मिळाली आहे आता त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही.
पीएम मोदींनी जन औषधी केंद्रांच्या स्थापनेवर देखील प्रकाश टाकला, जे 80 टक्के सवलतीत औषधे पुरवतात, ज्यामुळे या केंद्रांवरून औषधे खरेदी करणाऱ्या कुटुंबांच्या वैद्यकीय खर्चावर एकत्रितपणे सुमारे 30,000 कोटी रुपयांची बचत होते.
पंतप्रधान म्हणाले, ही आमची तिसरी टर्म आहे, आम्ही आधुनिक, सक्षम आणि विकसित भारत निर्माण करण्यासाठी वचनबद्ध आहोत. आपल्या सर्वांसाठी देश नेहमीच प्रथम आला पाहिजे. आपण सर्व मिळून विकसित भारताचे स्वप्न साकार करूया.” असं पंतप्रधान आपल्या भाषणात शेवटी म्हंटल आहे.