सध्या एआयचा वापर प्रचंड वाढला आहे. अगदी छोट्या-छोट्या कामांसाठी चॅटजीपीटी, ओपनएआय सारख्या AI अॅप्स आणि एआय प्लॅटफॉर्म्सचा सर्रासपणे वापर केला जात आहे. अशातच आता भारत सरकारने एक महत्वाचा आदेश जारी केला आहे. या आदेशामध्ये आता सरकारी कर्मचाऱ्यांना एआय अॅप्स आणि प्लॅटफॉर्म्सबाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे.
भारत सरकारने जारी केलेल्या आदेशात सरकारी कर्मचाऱ्यांना सांगण्यात आल आहे की, ‘कार्यालयातील काही कर्मचारी संगणक आणि लॅपटॉपमध्ये AI ॲप्स (ChatGPT, DeepSeek इ.) मोठ्या प्रमाणात वापरतात, जे भारत सरकारच्या गोपनीय दस्तऐवज आणि डेटासाठी धोकादायक ठरू शकतात.
सरकारी संगणक, लॅपटॉप आणि उपकरणांमध्ये एआय ॲप्स आणि टूल्सचा वापर करू नये, अस केंद्र सरकारने अहवालातून सरकारी कर्मचाऱ्यांना सांगितलं आहे. केंद्र सरकारच्या अहवालात म्हंटल आहे की, ‘डेटा आणि गोपनीयतेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला आहे.’
भारतात सध्या अनेक विदेशी AI ॲप्स उपलब्ध आहेत. ज्यात ChatGPT, DeepSeek आणि Google Gemini इत्यादी नावांचा समावेश आहे. भारतातील बरेच लोक या अप्सचा वापर काम सोपे करण्यासाठी करत आहेत. AI ॲप्सचा वापर करताना हे अप्स आवश्यक परवानग्यांसाठी प्रवेश मागतात. अशा स्थितीत सरकारी डेटा लीक होण्याचा धोका आहे. आणि म्हणूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.
एआय कसे कार्य करते?
एआय ॲप्सच्या मदतीने तुम्ही तुमची अनेक प्रश्न सहज सोडवू शकता. एआय हे ‘तुमच्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आणि तुमच्या बऱ्याच अडचणी सहज सोडवणीसाठी बनवलं गेलं आहे. या ॲप्समुळे अनेक प्रश्नांची सहज उत्तर शोधता येतात. सोबतच अनेक विषयावरचे लिखाण सहज सोप्पं होऊन जातं. यातून लिखाणाला एक चांगलं स्वरूप दिलं जाऊन लिखाण सहज सोप्पं होऊन जातं. तसंच हे अनेक कामांमध्ये मदत करत.