आंतरराष्ट्रीय जगतातून मोठी बातमी समोर येत आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला संपवून टाकण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी नुकतंच यावर भाष्य केलं आहे. ‘जर मला मारण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण इराण ननष्ट होईल.’ असा इशारा त्यांनी दिला आहे. यासंबंधिच्या सूचना देखील ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांना दिल्या आहेत.
याशिवाय, इराणला लवकरात लवकर अण्वस्त्र प्रकल्प थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच हा प्रकल्प थांबवण्यासाठी ट्रम्प सरकराकडून इराणवर दबाव देखील आणला जात आहे. जर इराणने हा प्रकल्प बंद केला नाही तर त्यांच्यावर अधिक कठोर प्रतिबंध लादले जातील, असा इशारा ट्रम्प दिला आहे.
ट्रम्प यांनी आपल्या सल्लागारांना निर्देश दिले की, ‘इराणने त्यांच्यावर हल्ला केल्यास संपूर्ण देश उद्धवस्त करून टाका. अशा प्रकारच्या आदेशावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सही देखील केली आहे.
यापूर्वी, पेनसिल्वेनियामध्ये झालेल्या सभेपूर्वी इराणच्या धमकीमुळे ट्रम्प यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. याच सभेदरम्यान ट्रम्प यांच्यावर जीवघेणा हल्ला झाला होता. मात्र, या हल्ल्यामागे इराण आहे, असे वाटत नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले होते.
खरं तर अमेरिकन अधिकारी अनेक वर्षांपासून ट्रम्प आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात इराणच्या धमक्यांचा मागोवा घेत आहेत. गेल्या अनेक काळापासून ट्रम्प यांच्यावर जीवघेणे हल्ले होत आहे. यामागे इराण असल्याचे स्पष्ट झाल्याने ट्रम्प यांनी इराणला आता थेट धमकीच दिली आहे. अमेरिकेला मिळालेल्या महत्वाच्या माहितीनुसार, इराणी अधिकाऱ्यांनी ट्रम्पवर यांच्यावर पाळत ठेवण्याचे व त्यांच्या हत्येची योजना आखण्याचे निर्देश दिले आहेत.’ अशी माहिती अमेरिकेच्या सुरक्षा यंत्रणेला मिळाली असून, आता अमेरिका सज्ज झाली आहे.