अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्राईलचे पंतप्रधान नेतन्याहू यांच्यात बुधवारी एक महत्वाची बैठक पार पडली. या भेटीदरम्यान, दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच दोन्ही नेत्यांमधील अधिकृत भेट आहे. या भेटीनंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली.
या परिषदेदरम्यान डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘अमेरिकेने गाझा पट्टीची मालकी घेऊन त्याचा विकास करावा अशी आमची इच्छा आहे. यावेळी त्यांनी युद्धग्रस्त पॅलेस्टिनी भूभाग गाझा पट्टीवर ताबा मिळवून त्याचा विकास करणार असल्याच त्यांनी सांगितल आहे.
ट्रम्प यांच्या विषयी बोलताना इस्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले आहेत की, ‘रिपब्लिकन नेत्याची कल्पना इतिहास बदलू शकते. ट्रम्प गाझासाठी वेगळ्या भविष्याची कल्पना करत आहेत.’
यावेळी ट्रम्प म्हणाले “आम्ही गाझा ताब्यात घेऊन त्याचा विकास करू. तसंच या याठिकाणी असलेली सर्व धोकादायक बॉम्ब आणि इतर शस्त्रास्त्रांचा नाश करण्याची जबाबदारी देखील घेऊ. तसंच युद्धात नष्ट झालेल्य इमारती पुन्हा उभारू आणि विकास करू. येथील आर्थिक विकासास देखील मदत करू. ज्यामुळे येथील लोकांना नोकऱ्या आणि घरे मिळतील.” या प्रदेशातील सुरक्षा पोकळी भरून काढण्यासाठी याठिकाणी सैन्य देखील तैनात करू असंही म्हंटल आहे.
ट्रम्प यांनी यावेळी गाझाच्या विकास योजनांवर भाष्य करताना लवकरच ते गाझाच्या दौऱ्यावर जातील असं देखील सांगितलं आहे. तसंच इस्राईल आणि सौदी अरेबियाला देखील ते भेट देणार असल्याचं त्यांनी म्हंटल आहे. मात्र, त्यांनी या दौऱ्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख घोषित केलेली नाही.
दरम्यान, इस्राईल आणि हमास यांच्यात सुरु असलेलं गाझा पट्टीवरील युद्ध काही दिवसांपूर्वीच थांबलं आहे. इस्राईल आणि हमासने युद्धबंदीच्या कारवार स्वाक्षरी करत युद्ध थांबवण्यास सहमती दर्शविली आहे. त्यानंतर पॅलेस्टिनी शहर गाझा येथे बॉम्बहल्ला थांबला आहे. गाझा पट्टीवरील युद्ध जरी थांबले असेल, तरी येथील स्थिती अजूनही बिकट आहे. कारण गेल्या १५ महिन्यांपासून सुरु असलेल्या या युद्धादरम्यान याठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशातच आता अमेरिकेने गाझा पट्टीवर ताबा घेणार असल्याची घोषणा केली आहे. युद्धात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचं ट्रम्प यांनी म्हंटल आहे.