टाटा समूहाचे माजी अध्यक्ष दिवंगत रतन टाटा हे एक असं नाव आहे, ज्यांच व्यक्तिमत्व आजही अनेकांना प्रेरित करतं. पैशाने श्रीमंत असलेले रतन टाटा मनानं देखील तितकेच श्रीमंत होते. आज त्यांनी अनेक गरजूंना मदत केली आहे.
रतन टाटा आणि त्यांचे विश्वासू असलेल्या शंतनू नायडू यांची मैत्रीही ही अशीच एका जिव्हाळ्याच्या विषयातून फुलली होती. याच शंतनू नायडूवर टाटा समूहानं एक महत्वाची जबाबदारी सोपवलीय ही जबाबदारी आहे.
शंतनू नायडू जरी वयाने लहान असला तरी तो रतन टाटा यांचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू मित्र होता. दोघांच्या मैत्रीचे अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल व्हायचे. दोघांची मैत्रीची सुरवात झाली ती एका जिव्हाळ्याच्या विषयापासून. शंतनूचं मुक्या प्राण्यांवरीत अफाट प्रेम आहे. यासाठीच शंतनूनं भटक्या कुत्र्यांचे प्राण वाचवण्यासाठी कुत्र्यांची काळजी घेणारी डॉग कॉलर प्रणाली विकसित केली. शंतनूचं हे काम रतन टाटांना अत्यंत भावलं. यामुळं टाटांनी शंतनूला भेटायला बोलावलं. या भेटीनंतर टाटांनीही शंतनूच्या या प्रोजेक्टमध्ये काम करायला सुरवात केली आणि हळूहळू दोघांची मैत्री वाढली. आता रतन टाटा यांच्या मृत्यूंनंतर शंतनू नायडू याला टाटा समूहामध्ये मोठी जबाबदारी मिळाली आहे.
शंतनू नायडूला टाटा ग्रुपमधील ऑटो कंपनी टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर आणि स्ट्रॅटजिक इनिशिएटिव्सचा प्रमुख बनवण्यात आलं आहे. खरंतर शंतनूवर टाकलेली ही जबाबदरी अत्यंत मोठी आणि महत्वाची आहे. शंतनू अवघ्या ३२ व्या वर्षी टाटा मोटर्समध्ये जनरल मॅनेजर बनला आहे. खरंतर शंतूननं २०१८ पासूनच रतन टाटा यांच्यासबोत त्यांचा साहयक म्हणून काम करत होता.
दरम्यान, शंतनूला इतकी मोठी जबाबदारी मिळाल्यानं शंतनू भावूक झाला आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिलं आहे की, ‘मला हे सांगताना आनंद होत आहे की, मी टाटा मोटर्समध्ये महाव्यवस्थापक प्रमुख आणि स्ट्रॅटेजिक इनिशिएटिव्हज म्हणून नवीन सुरुवात करत आहे. मला अजूनही आठवतं की, माझे वडील टाटा मोटर्सच्या प्लांटमधून पांढरा शर्ट आणि नेव्ही पॅन्ट घालून परत यायचे तेव्हा मी खिडकीपाशी त्याची वाट पाहत असायचो. जिथून सुरुवात झाली तिथून आयुष्य परत आले. त्यामुळं शंतूनाच्या कुटुंबियांसाठी सुद्धा ही अभिमानाची बाब आहे.’