CM Devendra Fadnavis : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची नुकतीच भेट घेतली आहे. आज सकाळी ९:३० वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरे यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या भेटीची राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा रंगत आहे. मुख्यमंत्र्याची ही सदिच्छा भेट असल्याचे भाजपच्या गोटातून सांगण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजपचे काही नेते देखील राज ठाकरेंच्या निवासस्थानी उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी भाजपाच्या राज्यातील विजयावर शंका उपस्थित करत टीका केली होती. अशास्थितीत मुख्यमंत्र्याची ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील भाजपा आणि महायुतीच्या विजयावर संशय व्यक्त केला होता. यानंतर भाजपा आणि मनसे या दोन पक्षात तणाव निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, आता भाजपाचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानावर दाखल झाल्यानंतर यावर चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी या दोन्ही नेत्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
Maharashtra CM Devendra Fadnavis reached MNS chief Raj Thackeray's residence to meet him.
(Image source: Maharashtra CMO) pic.twitter.com/NTJwetQeym
— ANI (@ANI) February 10, 2025
दरम्यान, मुंबई, पुणे महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची असल्याचं बोललं जात आहे. आजच्या या भेटीत अनेक राजकीय मुद्द्यांवर चर्चा झाली असावी. असं देखील म्हंटल जात आहे. दोन्ही नेत्यांनी जवळपास 1 तासाहून अधिक वेळ चर्चा केली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांच्या अचानक घेतलेल्या भेटीबाबतची नेमकी माहिती समोर आलेली नाही.