दक्षिण मेक्सिकोमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. रस्ते अपघातात एका ट्रकची बसला जोरदार धडक झाली. या धडकेत बसला आग लागली व या आगीत बसमधील तब्बल ४१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मेक्सिकोच्या टबास्को राज्य सरकारने एक निवेदन सादर करत म्हंटले आहे की, “४८ प्रवाशांना घेऊन जाणारी बस एका ट्रकला धडकली. बस कॅनकुनहून तबास्कोला येत होती. या अपघातात बसमधील ३८ प्रवासी आणि दोन चालकांचा मृत्यू झाला आहे. ट्रक चालकाचाही यामध्ये मृत्यू झाला आहे.’
या अपघातचा एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. हा अपघात इतका भयान होता की, या व्हिडिओमध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाल्याचे दिसत आहे. समोर आलेल्या ताज्या अपडेटनुसार, ‘आतापर्यंत फक्त 18 मृतदेहांची ओळख पटवण्यात आली आहे. जळून खाक झालेल्या मृतदेहांची ओळख पटवणे कठीण होत आहे, त्यामुळे तपास यंत्रणा डीएनए चाचणीच्या आधारे मृतांच्या कुटुंबीयांचा शोध घेत आहेत. बचावकार्य अद्याप सुरूच आहे आणि मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ट्रक आणि बसची धडकी इतकी जबरदस्त होती की, ‘बसने त्वरित पेट घेतला. प्रवाशांना बाहेर पडण्याची संधी देखील मिळाली नाही. घटनेनंतर बस पूर्णतः जळून खाक झाली आहे.