शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे यांना हा पुरस्कार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. यानिमित्ताने दोन्ही नेते आज एकाच मंचावर दिसणार आहेत.
सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्यात येणार आहे. अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री शिंदे यांना हा सन्मना देण्यात येणार आहे.
दिल्लीत नवीन महाराष्ट्र सदनात ११ फेब्रुवारी रोजी हा पुरस्कार प्रदान समारंभ पार पडणार आहे. 5 लाख रुपये, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि शिंदेशाही पगडी असं पुरस्काराचं स्वरुप आहे. अशातच आता शरद पवार आणि एकनाथ शिंदे दिल्लीत एकत्र दिसणार असल्याने या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.
यावेळी केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, जेष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे आणि पद्मभूषण राम सुतार प्रामुख्याने उपस्थित राहतील.