भाजपला हरवण्यासाठी एकत्र आलेली इंडी आघाडी आता तुटण्याच्या मार्गावर आहे. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या काही राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये ‘इंडी’ आघाडीमधील घटक पक्ष स्वतंत्र निवडणूक रिंगणात उतरले. दिल्ली विधानसभेत देखील असचं काहीस चित्र बघायला मिळालं.
इंडी आघडीतील दोन पक्ष आम आदमी आणि काँग्रेस यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या. हरियाणात झालेल्या निवडणुकीत देखील असंच काहीस चित्र होत. या सर्वच निवडणुकांमध्ये या पक्षांना पराभवाचा सामना करावा लागला. यानंतर आता २०२६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहेत. मात्र, इथं देखील अशीच स्थिती बघायला मिळणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीसाठी आपली भूमिका स्पष्ट करत ‘इंडी’ आघाडीला झटका दिला आहे.
विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी झालेल्या अंतर्गत बैठकीत ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस स्वबळावर निडवणूका लढवणार असल्याचे सांगितलं आहे. तसंच स्वबळावर निवडणूक लढवून पुन्हा जिंकून येऊ असा विश्वास देखील व्यक्त केला आहे.
या बैठकीत ममता बॅनर्जी म्हणाल्या, “पुढच्या वर्षी तृणमूल काँग्रेस दोन तृतीयांशपेक्षा जास्त बहुमताने पुन्हा सत्तेत येईल. बंगालमध्ये भाजपचा सामना करण्यासाठी तृणमूल काँग्रेस पुरेशी आहे.”
यावेळी त्यांनी आम आदमी पक्षाने हरियाणामध्ये काँग्रेसला मदत केली नाही आणि नुकत्याच झालेल्या निवडणुकीत काँग्रेसने दिल्लीत आम आदमी पक्षाला साथ दिली नाही. असंही म्हणून दाखवलं आहे.
पुढे त्यांनी असंही म्हंटल आहे की, ‘दोन्ही पक्षांनी एकत्र काम केले असते तर निकाल वेगळेच आले असते. जर काँग्रेसने ‘आप’ला दिल्लीत साथ दिली असती व हरियाणामध्ये ‘आप’ ने काँग्रेसला पाठिंबा दिला असता तर दोन्ही राज्यातील निकाल आज वेगळे असते.
यापूर्वी जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी देखील दिल्ली निवडणुकीवर आपलं मत व्यक्त केलं होतं. युती नसल्यामुळे असा निकाल लागला आहे. असं त्यांनी म्हणून दाखवलं होत. अशास्थितीत इंडी आघाडीत बिघाडीचं चित्र स्पष्ट दिसत आहे. कारण इंडी आघाडीतील सर्वच पक्ष आता स्वबळाचा नारा देत आहेत.