नुकताच काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाकडून उध्दव ठाकरे यांच्या गटातील खासदारांना आमदारांना आणि नगरसेवकांना फोडण्यासाठी ऑपरेशन टायगर लॉन्च करण्यात आले होते. या ऑपरेशन टायगरचा आता रिझल्ट यायला लागले आहेत असं आपण म्हणून शकतो कारण उध्दव ठाकरे यांचे निष्ठावान आणि ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनी नुकताच ठाकरे गटाला अखेरचा जय महाराष्ट्र करतं कायमचा राम – राम करून शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या त्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागलेले असतानाच त्यांना मोठा धक्का बसला आहे. साळवी यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या जोरदार प्रतिसादाने अपेक्षा वाढलेल्या शिवसेनेची विधानसभा निवडणुकीत मात्र जोरदार पिछेहाट झाल्याने अनेक नेत्यांना भविष्यातील राजकीय वाटचालीची चिंता लागून राहिली आहे. काही नेत्यांमध्येही पक्षांतराविषयीची चलबिचल मनात सुरू असताना इकडे कोकणातील शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे माजी आमदार राजन साळवी यांनीही शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करण्याचा निर्णय घेतला आहे. असं बोललं जातंय.
साळवी यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा शिवसेना भवन कार्यालयात दिला. उद्या साळवी ठाण्यात शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून साळवी हे शिवसेना सोडतील अशा चर्चा होत्या. ईडीची वक्रदृष्टी पडल्यानंतर काही काळ त्यांनी संघर्ष करण्याचा मार्ग स्वीकारला. परंतु पक्षनेतृत्वाची म्हणावी अशी साथ मिळत नसल्याची भावना त्यांच्या मनात होती. शिवाय माजी खासदार विनायक राऊत यांच्याशीही त्यांचे अजिबातच जमत नव्हते. सगळी कारणे जुळून आल्यावर अखेर त्यांनी उद्धव ठाकरे यांना जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतला.
तब्बल तीन वेळेला आमदार राहिलेल्या राजन साळवी यांनी कोकणात शिवसेनेची पाळेमुळे घट्ट रुजवली. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबतही राजन साळवी यांनी काम केले. शिवसेनेकडून तीन वेळा त्यांनी राजापूर विधानसभेचे प्रतिनिधित्व केले.
आता अजून अनेक नेते हे क्यू मध्ये आहेत त्यामुळें ते लवकरच आमच्या सोबत येतील अशी प्रतिक्रिया शिंदे गटाच्या एका ज्येष्ठ नेत्याने दिली आहे.