फ्रान्सचा दौरा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. अमेरिकेत दाखल होताच मोदींचं विमानतळावर जंगी स्वागत करण्यात आलं. अमेरिकेत दाखल होताचं पंतप्रधान मोदी यांनी सकाळी ट्विट करत याबद्दल माहिती दिली.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान मोदींनी लिहिले, ‘थोड्या मी वेळापूर्वी वॉशिंग्टन डी. सी. मध्ये उतरलो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेण्यासाठी व भारत-अमेरिका या देशांची व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्यासाठी उत्सुक आहे. दोन्ही देश आपल्या लोकांच्या फायद्यासाठी आणि चांगल्या भविष्यासाठी एकत्र काम करत राहतील.” असं ट्विट मोदींनी केलं आहे.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील भारतीयांचे देखील आभार मानले आहेत. पंतप्रधानांनी एक्स वर पुढे लिहिले, “हिवाळ्याच्या या थंड वातावरणात वॉशिंग्टन डी. सी. मधील भारतीय समुदायाकडून माझे विशेष स्वागत करण्यात आले आहे. मी त्यांचा आभारी आहे.”
अमेरिकेत दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांची भेट देखील घेतली. गबार्ड यांच्याशी भारत-अमेरिका मैत्रीच्या विविध पैलूंवर चर्चा देखील केली.
या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी वॉशिंग्टन डी. सी येथील ब्लेअर हाऊसमध्ये राहणार आहेत. त्यांच्या आगमनापूर्वी ब्लेअर हाऊसमध्ये अमेरिकन ध्वजाच्या जागी भारताचा झेंडा फडकवण्यात आला.
थोड्या वेळात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नरेंद्र मोदी यांची भेट घेतील. यानंतर दोन्ही नेते अनेक मुद्द्यांवर चर्चा करतील. मोदींचा हा अमेरिका दौरा दोन दिवसांचा असेल.
A warm reception in the winter chill!
Despite the cold weather, the Indian diaspora in Washington DC has welcomed me with a very special welcome. My gratitude to them. pic.twitter.com/H1LXWafTC2
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2025
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा होणार आहे. 20 जानेवारी रोजी ट्रम्प यांच्या शपथविधीनंतर अमेरिकेला भेट देणाऱ्या मोजक्या जागतिक नेत्यांपैकी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींना फोन करून अमेरिकेत येण्याचे निमंत्रण दिले होते. यासंबंधित ट्रम्प यांनी स्वतः माहिती दिली होती. ट्रम्प यांचे निमंत्रण स्वीकारून पंतप्रधान हा दौरा करत आहेत.
दरम्यान, यावेळी पंतप्रधान मोदी उद्योगपती आणि भारतीय समुदायाच्या सदस्यांशीही संवाद साधणार आहेत.