अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्यानंतर आपली नवीन टीम गठीत करण्याचे काम सुरु केले आहे. ट्रम्प आपल्या टीममध्ये भारतीय वंशाच्या लोकांना महत्वाच्या जबाबदाऱ्या सोपवत आहेत. याचदरम्यान, अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर संचालकपदावर भारतीय वंशाच्या तुलसी गबार्ड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तुलसी गबार्ड यांची बुधवारी सिनेटमध्ये झालेल्या अंतिम मतदानानंतर अमेरिकेचे राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून अधिकृतपणे निवड करण्यात आली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी तुलसी गबार्ड यांची निवड केली आहे.
यासह, आता भारतीय वंशाची गबार्ड अमेरिकेच्या 18 गुप्तचर संस्थांच्या प्रमुख बनल्या आहेत. ज्या आता देशाच्या सुरक्षेशी संबंधित बाबींवर काम करतील.
सिनेटमध्ये तुलसी गबार्ड यांच्या नावाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा मिळाला. 52 पैकी 48 लोकांनी गॅबार्ड यांच्या बाजूने मतदान केले आहे.
11 सप्टेंबर 2001 च्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेवर अनेक सवाल उपस्थित करण्यात आले होते. गुप्तचर यंत्रणेच्या अपयशांना तोंड देण्यासाठी अमेरिकेने राष्ट्रीय गुप्तचर संचालकांचे कार्यालय सुरु केले. आता गबार्ड याची जबाबदारी हाती घेतील. यासह आता त्या अमेरिकेच्या सर्वोच्च गुप्तचर अधिकारी बनल्या आहेत.
गबार्ड यांना गुप्तचर क्षेत्रातील फारसा अनुभव नाही आणि म्हणून या पदासाठी त्यांची निवड होणे अपेक्षित नव्हते, मात्र, त्यांनी 2004 ते 2005 दरम्यान इराकमधील हवाई नॅशनल गार्डमध्ये मेजर म्हणून काम पहिले आहे.
दरम्यान, आता त्या संचालक म्हणून, सीआयए, एफबीआय आणि नॅशनल सिक्युरिटी एजन्सी (एनएसए) यासह 18 गुप्तचर संस्थांचे नेतृत्व करतील.