नुकतीच ‘डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी’(DOGE) या विभागाची जबाबदारी अब्जाधीश व डोनाल्ड ट्रम्प यांचे जवळचे मित्र इलॉन मस्क यांच्याकडे सोपवली आहे. या विभागाचा मूळ उद्देश संघीय खर्चात कपात करणे हा आहे. ट्रम्प यांच्या सरकारमध्ये सामील होताच मस्क यांनी अमेरिकेला आर्थिक धोक्याचा इशारा दिला आहे.
या पत्रकार परिषदेत एलोन मस्क यांनी अमेरिकेच्या अर्थसंकल्पाबाबत चिंता ब्यक्त केली आहे. यावेळी मस्क म्हणाले, ‘अमेरिकेने जर संघीय खर्चात कपात केली नाही तर अमेरिका लवकरच दिवाळखोर होईल.’ यावेळी ते म्हणाले, सरकारी खर्चात कपात करणे हा पर्याय नसून गरजेचं आहे. जर असे केले नाही तर अमेरिका दिवाळखोर होईल असं त्यांनी स्पष्ट शब्दात म्हंटल आहे.
मंगळवारी पार पडलेल्या या पत्रकार परिषदेत मस्क म्हणाले की “अमेरिकेने आपल्या बजेटमध्ये कपात करणं आवश्यक आहे.’
सरकारी कार्यक्षमता विभाग (DOGE) चे प्रमुख मस्क यांच्यावर आता सरकारी खर्च कमी करण्याची जबाबदारी आहे. याविषयी मस्क यांनी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्यासोबत बजेट कपातीबद्दल देखील चर्चा केली.
जगातील इतर देशांप्रमाणे जागतिक महासत्ता असलेली अमेरिकाही आपली अर्थव्यवस्था चालवण्यासाठी कर्ज घेत आहे. यावर सरकारला व्याज द्यावे लागते, जे सध्या मोठे ओझे बनत चालले आहे. व्हाईट हाऊसमधील चर्चेदरम्यान मस्क यांनी याकडेच लक्ष वेधले, मागील आर्थिक वर्षात अमेरिकेची अर्थसंकल्पीय तूट तब्बल 1.8 ट्रिलियन डॉलर एवढी होती. या तुटीवरुन मस्क यांनी चिंता व्यक्ती केली आहे. तसेच, देशाच्या खर्चात कपात करणे हा आता पर्याय राहिलेला नसून, तर ती एक अनिवार्यता बनली आहे, असे देखील त्यांनी स्पष्ट केले.