आंध्र प्रदेश सरकारने राज्यातील महिलांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी राज्यातील महिलांसाठी घरून काम करण्याची योजना आखली आहे. याबात घोषणा करत नायडू म्हणाले, ‘सरकाराच्या या निर्णयामुळे महिलांना व्यावसायिक व कौटुंबिक जीवनात समतोल राखता येईल.
‘कोरोना साथीच्या आजारानंतर घरून काम करण्याची पद्धत अधिक लोकप्रिय झाली आहे. व ते तंत्रज्ञानाच्या मदतीने सोपे देखील आहे. वर्क फ्रॉम होममुळे वैयक्तिक जीवनात समतोल राखणं सोपं होत. आणि म्हणूनच आंध्र प्रदेश सरकार यासाठी प्रयत्न करत आहे.’ असं त्यांनी म्हंटल आहे
नायडू पुढे म्हणाले, “राज्यातील अधिकाधिक लोकांनी, विशेषतः महिलांनी घरून काम करावे अशी आमची इच्छा आहे”, यामुळे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवन सुधारेल. तसंच व्यावसायिक जीवनात महिलांचा सहभाग वाढावा अशी आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
प्रत्येक शहर व गावांमध्ये आयटी कंपन्या तयार करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्यातील रोजगार वाढावा यासाठी सरकार आयटी/जीसीसी कंपन्यांना पाठिंबा देत आहे, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.
पुढे त्यांनी या प्रयत्नांचा विशेषतः महिलांना फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. यामुळे महिलांकडे घरून काम करण्याचा पर्याय असेल. आणि महिला व्यासायिक जीवनात मोठ्या प्रमाणात सक्रिय होतील.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘सरकारच्या पुढाकारामुळे आता नोकऱ्या करणाऱ्या व्यक्तींना आपल्या वैयक्तिक आणि व्यवसायिक जीवनामध्ये संतुलन साधता येईल. या दिशेने पाऊल टाकत आंध्र प्रदेश सरकारने आयटी आणि जीसीसी पॉलिसी 4.0 एक गेम चेंजिंगने पुढाकार घेतला आहे.