मराठी अभिनेते अशोक सराफ यांच्या इमारतीबाहेर गोळीबार झल्याची माहिती मिळत आहे. ही घटना ओशिवारा येथील इंद्र दर्शन या ठिकाणी घडली. मद्यपींनी हवेत बाटल्या फोडण्यासाठी फायरिंग केल्याची धक्कदायक घटना समोर आलीये. या प्रकरणी आता पोलिसांनी आरोपींना अटक केली असून पुढील कारवाई सुरु केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘एअर गनने फायरिंग करताना बंदुकीतून एक छर्रा सुटून इमारतीमधील एका काचेवर लागून काच फुटल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे.
याप्रकरणी, अशोक सराफ यांची प्रतिकिया समोर आली असून, घडलेल्या सर्व प्रकारावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. तरुणाईच्या हातात शस्त्र कुठून येतात? असा प्रश्न उपस्थितीत करत तरुण पिढीबाबत चिंता व्यक्त केली आहे.
गेल्या काही काळापासून, मुंबई-पुणे सारख्या शहरात अशा घटना सात्यत्याने घडत आहेत. त्यामुळे शहरी भागात भीतीचे वातावरण कायम आहे. एकीकडे कोयता गँग दहशत पसरवत असताना आता मुंबईत भर दिवस गोळीबार झाल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली आहे.