अलीकडच्या काळात इस्राईल आणि हमास यांच्यात सुरू असलेला युद्धबंदी करार बिघडल्यामुळे आणि नव्याने युद्धाच्या भीतीमुळे हमासने आणखी तीन इस्राईली बंदकांची सुटका केली आहे. त्या बदल्यात इस्राईलने एकूण 369 पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली आहे.
15 महिन्यांहून अधिक काळ चाललेल्या या भीषण संघर्षात हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. तर लाखो लोकांना आपली घरे सोडावी लागली आहेत. ज्यानंतर इजिप्त, कतार, सौदी अरेबिया आणि अमेरिकेसारख्या अनेक देशांच्या प्रयत्नांनंतर चार आठवड्यांपूर्वी इस्राईल आणि हमास यांच्यात युद्धबंदी कराराला सुरुवात झाली. मात्र, अलीकडच्या काळात काही वादांमुळे दोघांमध्ये पुन्हा युद्ध सुरु होण्याची भीती होती.
इस्राईल कराराप्रमाणे मदत पोहचवत नसल्याचा आरोप करत हमासने उर्वरित बंधकांची सुटका न करण्याची धमकी दिली होती. त्यानंत इस्राईलनेही पुन्हा युद्ध सुरू करू अशी धमकी दिली. याच पार्श्वभूमीवर इस्राईलने पुन्हा आपल्या सैन्याला गाझा पट्टीवर बोलवल होते. तसंच आपल्या सैन्याला हाय अलर्टवर ठेवलं होते.
कराराअंतर्गत हमासकडून अनेक टप्प्यात इस्राईली बंधकांची सुटका केली जात आहे. त्या बदल्यात इस्राईल शेकडो पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका करत आहे. मात्र, करारानुसार हमासने शनिवारी बंधकांची सुटका केली नाही आणि तारीख पुढे ढकलली. हमासने बंदिस्त केलेल्या 200 पैकी आतापर्यंत 21 ओलीसांची सुटका केली आहे. मात्र, हमासने मधेच ओलीसांची सुटका थांबवली.
यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी हमासला धमकी देत शनिवारी बंदकांची सुटका केली नाही तर प्रत्येक परिस्थितीसाठी तयार राहण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर आता हमासकडून करारानूसार तीन ओलीसांची सुटका करण्यात आली आहे.