कॅनडातील टोरंटो विमानतळावर मोठा अपघात झाल्याची बातमी समोर येत आहे. डेल्टा एअरलाइन्सचे एक विमान लँडिंग करताना अचानक उलटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत काही प्रवासी गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या विमानात क्रू मेम्बर्ससह 80 प्रवासी होते. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, या घटनेत १८ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातानंतर आपत्कालीन पथके ताबडतोड घटनास्थळी पोहोचले व त्यांनी लगेच बचाव कार्य सुरु केलं आणि सर्व प्रवाशांना लगेच बाहेर काढण्यात आले.
टोरंटो विमानतळावर उतरताना हे विमान बर्फवृष्टीमुळे धावपट्टीवरून घसरले. धावपट्टीवर घसरण असल्यामुळे ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेची माहिती विमानतळ प्राधिकरणाने सोशल मीडियावर शेअर करत याला दुजोरा दिला आहे.
Delta Connection flight 4819, operated by Endeavor Air using a CRJ-900 aircraft, was involved in a single-aircraft accident at Toronto Pearson International Airport (YYZ) at around 2:15 p.m. ET* on Monday. The flight originated from Minneapolis-St. Paul International Airport…
— Delta (@Delta) February 17, 2025
डेल्टा एअरलाइन्सचे हे विमान मिनियापोलिसहून टोरंटोला येत होते. लँडिंग दरम्यान विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते उलटले. या घटनेची चौकशी सुरू असून सध्या विमानतळावरील दोन धावपट्ट्या बंद राहतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
या अपघाताचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये विमान धावपट्टीवर उतरताना दिसत आहे. विमान धावपट्टीवर उतरत असताना अचानक उलटले आणि विमानात धूर येऊ लागला. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली. आणि बचावकार्य सुरु केले. ज्यामुळे मोठी दुर्घटना टळली.