कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केले आहे. कतारचे अमीर शेख 17 ते 18 फेब्रुवारी दरम्यान भारताच्या राजकीय दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यादरम्यान ते अनेक मुद्दयांवर चर्चा करणार आहेत. आज ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांची भेट घेतील. व या वरिष्ट नेत्यांशी वेगवगेळ्या विषयावर चर्चा करतील.
कतारचे अमीर शेख यांच्या दौऱ्यायासंबंधित परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी एका निवेदन सादर केलं आहे. निवेदनात म्हंटले आहे की, “अमीर शेख तमीम बिन हमद अल-थानी यांच्या या भारत दौऱ्यामुळे विविध क्षेत्रातील भागीदारीला आणखी चालना मिळेल. व दोन्ही देशातील व्यवसाय संबंध आणखी मजबूत होतील. कतारचे अमीर शेख 17-18 फेब्रुवारी दरम्यान त्यांच्या दौऱ्यात भारतातील मंत्री, वरिष्ठ अधिकारी आणि व्यावसायिक प्रतिनिधीमंडळासह उच्चस्तरीय शिष्टमंडळासह अनेकांची भेट घेतील.”
निवेदनात पुढे म्हंटल आहे की, “मंगळवारी सकाळी, कतारचे अमीर शेख यांचे राष्ट्रपती भवनाच्या आवारात औपचारिक स्वागत केले जाईल, त्यानंतर हैदराबाद हाऊसमध्ये ते पंतप्रधान मोदींची भेट घेतील. या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा केली जाईल.’
पंतप्रधान मोदी यांच्याशी द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा करणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने शनिवारी सादर केलेल्या निवेदनात म्हंटले आहे. निवेदनात पुढे म्हटले आहे की, “मंगळवारी दुपारी या बैठकीत अनेक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात येईल. त्यानंतर कतारचे अमीर राष्ट्रपती मुर्मू यांची भेट घेतील.”
पंतप्रधान मोदींच्या निमंत्रणावरून अमीर शेख तमीम बिन हमद अल थानी भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांचा हा दुसरा भारत दौरा असेल. यापूर्वी ते मार्च 2015 मध्ये भारत दौऱ्यावर आले होते. अलिकडच्या वर्षांत दोन्ही देशात व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, तंत्रज्ञान, संस्कृती यासह विविध क्षेत्रात भारत आणि कतार यांच्यातील संबंध दृढ झाले आहेत. अशातच आता त्यांच्या या भारत भेटीने दोन्ही देशांचे संबंध अधिक मजबूत होतील. असं बोललं जात आहे.