‘इंडियाज गॉट लेटेंट’ मध्ये केलेल्या वादग्रस विधानावर आता सर्वोच्च न्यायालयाने रणवीर अलाहाबादियाला कडक शब्दात फटकारलं आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून रणवीर अलाहाबादिया जरी दिलासा मिळाला असला तरी देखील सर्वोच्च न्यायालयाने रणवीरच्या व्यक्तव्यावर संताप व्यक्त केला आहे.
रणवीर अलाहाबादियाने इंडियाज गॉट लेटेंट कार्यक्रमात एक आक्षेपार्ह विधान केल होत. यानंतर रणवीर अलाहाबादियाविरोधात सर्वत्र संतापाचे वातावरण निर्माण झाले. त्याच्या या वक्तव्याविरोधात फक्त महाराष्ट्रातच नाही तर अनेक राज्यांमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. या सर्व ‘एफआयआर’ एकत्र करत अटक टाळण्यासाठी रणवीरने सर्वोच्च न्यायालय गाठले. याप्रकरणी मंगळवारी सुनावणी पार पडली. तेव्हा, सर्वोच्च न्यायालयाने रणवीरला दिलासा दिला. पण त्याला त्याच्या वक्तव्याबद्दल चांगलाच फटकारलं आहे.
न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश एन. कोटिश्वर सिंह यांच्या खंडपीठासमोर काल रणवीरच्या प्रकरणासंबंधित सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने रणवीरला अटकेपासून जरी संरक्षण दिले असले तरी देखील त्याचे पासपोर्ट जप्त करण्यात आले आहे. न्यायालयाला सांगितल्याशिवाय रणवीरला परदेशात आता जाता येणार नाही.
सर्वोच्च न्यायालयाने रणीवरला त्याने केलेल्या विधानाबद्दल सुनावत म्हंटल आहे की, “तुमच्या डोक्यात घाण भरली आहे. अशा व्यक्तीचे प्रकरण आम्ही कशासाठी ऐकावे? प्रसिद्ध असला म्हणून तुम्ही काहीही बोलू शकता, असे नाही. तुम्ही लोक आई-वडिलांचा अपमान करत आहात. तुमच्या डोक्यात घाण आहे,” अशा शब्दात न्यायालयाने रणवीरला झापलं आहे.
रणवीरचे वकील अभिनव चंद्रचूड यांनी न्यायालयाला सांगितले की, “यूट्यूबरला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्याची जीभ कापणाऱ्याला 5 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलय.”
Chandrachud: Guwahati FIR is far more comprehensive
J Kant: And it deals with 2 different kind of offenses. There has to be lack of responsibility…this type of condemnable behavior…it's not a question of an individual's morality.#SupremeCourt @BeerBicepsGuy
— Live Law (@LiveLawIndia) February 18, 2025
यावर न्यायालयाने वकिलांना थांबवून म्हटले, “तुम्ही रणवीरच्या वक्तव्याचा बचाव करत आहात का?” यानंतर वकिलांनी सांगितले, “यूट्यूबर आपण केलेल्या विधानावर स्वत: नाराज आहे. पण, हे प्रकरण इतके मोठे आहे का? की त्याच्यावर फौजदारी खटला दाखल करावा? त्याचा हेतू विनोदाचा होता. कोणाच्याही प्रतिष्ठेला किंवा भावनांना दुखावण्याचा हेतू नव्हता.”
त्यावर न्यायाधीश सूर्यकांत यांनी फटकारत म्हटले, “तुम्हाला कॉमेडीच्या नावाखाली काहीही बोलण्याची परवानगी मिळाली आहे का? तुमची भाषा अपमानास्पद आणि आक्षेपार्ह होती. सध्या त्याच्याविरुद्ध अनेक ठिकाणी एफआयर दाखल आहेत.”
न्यायाधीश सूर्यकांत म्हणाले, “जर अशी विधाने अश्लील नाही तर काय आहेत? तुम्ही कोणती भाषा वापरत आहात? तुम्हाला अशा गोष्टी बोलण्याचे स्वातंत्र्य कसे मिळते? रणवीरच्या विधानामुळे पालक नाहीतर बहिणींना सुद्धा लाज वाटली. ही विकृत मानसिकता आहे. आपल्याकडे कायद्याचा आधारावर चालणारी न्यायव्यवस्था आहे. अशा धमक्या मिळत असतील, तर कायदा आपले काम करेल.” असं न्यालयाने म्हंटल आहे.