सध्या राज्यात अस्तित्वात असलेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्ष लवकरच रिकामा होईल आणि लवकरच एक दिवस आदित्य ठाकरे देखील उद्धव ठाकरे यांना सोडून जातील, अशा मोजक्या शब्दात सांगोला विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार आमदार शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणावर गळती लागलेली दिसते आहे. राजन साळवी यांच्यासारख्या अनेक नेत्यांनी आणि मातोश्रीचा निष्ठावंत म्हणवल्या जाणाऱ्या शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला राम – राम ठोकत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला पसंती देत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय.
एकंदरितच ठाकरे गटाला लागलेली ही गळती थांबयचं नाव घेत नाही. यासगळ्यावरून सांगोला विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी यावरुन निशाणा साधला आहे. ते म्हणाले की ठाकरे गटाचे अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करत आहे. तर आणखी काही नेते वाटेवर आहेत. तसेच लवकरच ठाकरे पिता-पुत्रांमध्येच फूट पडेल आणि आदित्य ठाकरे हे देखील शिंदे गटात येतील, असं भाकीत त्यांनी केलं आहे.