गेल्या काही दिवसांपासून एक चित्रपट मोठा चर्चेत आहे. तो चित्रपट म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांवर आधारित ‘छावा.’ लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित या चित्रपटात अभिनेता विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या चिपत्राचे अनेकजण कौतुक करत करत आहेत. तर दुसरीकडे चित्रपट समीक्षक कमाल रशीद खाननं या चित्रपटावर प्रतिक्रिया देत छत्रपती संभाजी महाराजांबाबत एक वादग्रस्त पोस्ट केली आहे.
केकेआरनं 17 फेब्रुवारीला केलेल्या ट्वीटमध्ये विकिपीडियावरील माहितीचा आधार घेतला होता. ज्यात छत्रपती संभाजी महाराजांबद्दल चुकीच्या आणि आक्षेपार्ह्य गोष्टी लिहिलेल्या होत्या. केकेआरची ही पोस्ट काही वेळातच व्हायरल झाली. पोस्ट व्हायरल झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची दखल घेतली व विकिपीडियाला छत्रपती संभाजी महाराजांबाबतची आक्षेपार्ह्य माहिती हटवण्याचे आदेश दिले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस सांगितले यांनी की, “छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल विकीपीडियावर आक्षेपार्ह लिखाण केलं गेलं आहे. या संदर्भात महाराष्ट्र सायबर विभागाचे प्रमुखांना मी सांगितलं आहे की विकिपीडिया आणि त्याच्याशी संबंधित यंत्रणांशी बोलणी करा. मजकूर हटवण्यास त्यांना सांगा अशा सूचना दिल्या आहेत. विकिपीडिया भारतातून संचालित होत नाही. हा ओपन प्लॅटफॉर्म आहे. त्याचे काही नियम आहेत. त्यावर कोण लिखाण करू शकतं याचे संपादकीय अधिकार काही लोकांना असतात. त्यामुळे आपल्याला त्यांना निश्चितपणे सांगता येईल की ऐतिहासिक तथ्य मोडूनतोडून किंवा चुकीच्या पद्धतीने लिहीणे योग्य नाही.”